Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

Thumbnail

View All
माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयातील शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे   कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ​ अजित पवार यांची जयंती…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहा…

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर…

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा,…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक, स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्याचा…

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार राष्ट्रीय स्पर्धेत ‘डीवायपीसीइटी व्हेक्टर्स’ संघ तृतीय कोल्हापूर /प्रतिनिधी :…

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

  येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे…

माय मराठी

गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा   कोल्हाकपूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा…

ताज्या देश पुणे प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी मुंबई

सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील गजबजलेल्या व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली उणीव…

माय मराठी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी १४ वा दीक्षांत समारंभ : पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी १४ वा दीक्षांत समारंभ : पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प् कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.…

ताज्या महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर/प्रतिनिधी : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या…

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार यांच्या समवेत शाहू प्रेमी यांची संयुक्त पाहणी राजश्री शाहू महाराज शाहू मिल येथे केली.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी पाहणी केल्यानंतर कोल्हापुरातले लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार महापौर उपमहापौर यांची एकत्रित बैठक न्यू पॅलेस येथे २८ मार्च २०२६ रोजी बोलवण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वांशी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करता येईल आणि त्याबाबत सर्व मंत्री लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. त्याबाबत सर्व लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार यांना पत्रव्यवहार झालेला आहे. तसेच समितीतील काही सदस्य प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींची भेटी घेणार आहेत. सर्वांना आमंत्रित करणार आहेत.
आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत शिवप्रेमी अँड.बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, विजय देवणे, बाबा पार्टी, शिवाजीराव कवाळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील टायर आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन कळंबा येथे झाले. कळंबा रोडवरील तारालक्ष्मी संकुल तपोवन समोर येथे ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. गेली बारा वर्षे उद्यमनगर येथील पहिल्या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता ग्राहकांसाठी ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. या शोरूमचे उद्घाटन एम.आर.एफचे विभागीय व्यवस्थापक अभिनय लघाटे यांच्या हस्ते झाले. जिल्हा व्यवस्थापक आशिष सिंग, न्यू आर. एम. टायर्स चे संचालक शिरीष मुळीक,सौरभ मुळीक आणि प्रणाली सौरभ मुळीक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या नवीन शोरूम मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे टायरची सर्व कामे एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. येथे एम.आर.एफ टायरची संपूर्ण रेंज उपलब्ध असून ॲटोमेटेड टायर चेंजिंग, कॉम्प्युटर व्हील बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट, ट्यूबलेस टायर रिपेरिंग तसेच नायट्रोजन फिलिंग यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. एम.आर.एफ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार सेवा आणि वातानुकूलित शोरूम मधील सुखद अनुभव हे या शाखेचे वैशिष्ट्य असणार आहे.
एम.आर.एफ ही भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टायर उत्पादक कंपनी आहे, जी तिच्या मजबुतीसाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. १९४६ मध्ये स्थापन झालेली चेन्नई मुख्यालय असलेली ही कंपनी दुचाकी, कार, ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांचे टायर बनवते. फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवलेली ही एक अग्रगण्य जागतिक ब्रँड असल्याचे एम.आर.एफचे कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक अभिनय लघाटे यांनी बोलून दाखवले.
के.एम. मॅमेन मॅप्पीलाय यांनी मद्रास येथे टॉय बलून (खेळण्यातील फुगे) बनवणारी कंपनी म्हणून सुरुवात केली होती, जी आज टायर उत्पादनात किंग बनली असल्याचे जिल्हा व्यवस्थापक आशिष सिंग यांनी बोलून दाखवले. शिवाय आर.एम टायर्सच्या वतीने गेली बारा वर्षे ग्राहकांसाठी चांगली सुविधा दिली जात असून आता त्यांची दुसरी शाखा कळंबा येथे सुरू झाली आहे. ग्राहकांनी या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन केले.
यावेळी स्वागतपर बोलताना सौरभ मुळीक यांनी उद्यमनगर येथे आम्ही ग्राहकांना गेली बारा वर्ष आम्ही सेवा देत आहोत त्या ठिकाणी आम्हाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यांच्या या आग्रहाखातरच आम्ही आता कळंबा येथे नवीन शाखा सुरू केली असून ग्राहक या ठिकाणी भेट देतील अशा विश्वास व्यक्त केला. तर प्रणाली मुळीक यांनी एम.आर.एफ ही टायर ग्राहकांना नेहमीच आवडीची ठरली आहे. ग्राहकांच्या गाड्यांसाठी ही टायर अत्यंत टिकाऊ आहे त्यामुळे आम्ही ग्राहकांना सेवा देण्यासाठी ही दुसरी शाखा सुरू केल्याचे सांगितले.आभार प्रणाली मुळीक यांनी मानले, सूत्रसंचालन सुखदा मुळीक यांनी केले.

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे दिली आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्च रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी २२ मार्च रोजी कृषी विभागातर्फे एका विशेष ‘पौष्टिक तृणधान्य रॅली’चे आयोजनही करण्यात आले आहे.

धान्य महोत्सवातील प्रमुख आकर्षणे.                                धान्य महोत्सवामध्ये ग्राहकांना शेतकऱ्यांकडून अस्सल ग्रामीण शुद्धतेचे धान्य आणि ओडीओपी (ODOP) व जीआय (GI) मानांकन प्राप्त दर्जेदार शेतीमाल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. प्रामुख्याने कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, पाटगावचा मध, आजरा घनसाळ आणि विविध प्रकारचे तांदूळ थेट विक्रीसाठी उपलब्ध असतील.
इतर जिल्ह्यांतील प्रसिद्ध शेतीमालही ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. बार्शीची ज्वारी, सोलापूरची डाळिंब, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सांगलीची द्राक्षे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा हापूस आंबा रेठरेचा इंद्रायणी तांदूळ आणि पुणे-पुरंदरचे अंजीर यांचा समावेश असेल. महोत्सवामध्ये बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले ‘रेडी टू सर्व्ह’ खाद्यपदार्थ आणि कृषी विभागाच्या विविध प्रकल्पांतर्गत तयार झालेले प्रक्रियायुक्त पदार्थही ग्राहकांना पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि खाण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

महिला बाईक रायडर्सची बाईक रॅली

२२ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता धान्य महोत्सवाचे औचित्य साधून आणि ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षा’निमित्त शहरात एका विशेष ‘पौष्टिक तृणधान्य बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅली प्रामुख्याने महिला बाईक रायडर्सची असणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्याच्या वापराबाबत जनजागृती निर्माण करणे आणि महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बाईक रॅली दसरा चौक पासून बिंदू चौक,उमा थिएटर चौक, बागल चौक, जनता बाजार चौक, व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे समारोप होईल.

शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व कोल्हापूरकरांनी २१ आणि २२ मार्च रोजी या धान्य महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन दर्जेदार शेतीमालाची खरेदी करावी आणि या उपक्रमास उदंड प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपला दर्जेदार शेतीमाल या प्रदर्शनात विक्रीसाठी आणावा, तसेच महिला शेतकऱ्यांचा सन्मान आणि आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
*****

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक, स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात कोल्हापुरी चप्पल उद्योगाच्या सुरक्षा आणि प्रगती विषयी विधेयक मांडले आहे. त्यातून कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन करण्यासाठी, खासदार महाडिक यांचा प्रयत्न आहे. चर्म उद्योगातून स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी हे विधेयक महत्वपर्ण आहे.
सध्या नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक मांडले. कोल्हापुरी लेदर क्राफ्ट प्रिझर्व्हेशन ऍन्ड लाईव्हली हूड सिक्युरिटी बिल या नावाने मांडलेल्या या विधेयकातून पारंपारिक चर्म उद्योगाला सुरक्षा स्थिरता आणि प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. खासदार महाडिक यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर करून, कोल्हापुरी चप्पल आणि अन्य चर्म उत्पादनांचा प्रचार आणि विकास करणे, पारंपारिक कलेचे जतन आणि संरक्षण करणे आणि या क्षेत्रात काम करणार्‍या नोंदणीकृत कामगारांच्या रोजगाराची सुरक्षा अबाधित ठेवणे, हा हेतू असल्याचे स्पष्ट केले. कोल्हापुरी चप्पल जगभर प्रसिध्द आहे. याशिवाय विविध प्रकारच्या चर्म उत्पादनांनाही वाढती मागणी आहे. अशा परिस्थितीत खासदार धनंंजय महाडिक यांनी संसदेत सादर केलेले विधेयक अत्यंत महत्वपूर्ण आहे.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

राष्ट्रीय स्पर्धेत ‘डीवायपीसीइटी व्हेक्टर्स’ संघ तृतीय

कोल्हापूर /प्रतिनिधी : डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या ‘एसएई इंडिया बाहा २०२६’ स्पर्धेत तब्बल १० पुरस्कारांवर नाव कोरले आहे. नरसापूर (हैद्राबाद ) येथे या स्पर्धेत महाविद्यालयाच्या ‘डीवायपीसीइटी व्हेक्टर्स’ या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर एकूण ५१ संघांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
‘एसएई इंडिया बाहा २०२६ ही स्पर्धा २००७ सालापासून राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते. या स्पर्धेत देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वतः एटीव्ही (ऑल टेरेन व्हेईकल) तयार करून त्याचे डिझाईन, स्ट्रेस अ‍ॅनालिसिस, एक्सलरेशन, ब्रेकिंग, सस्पेन्शन, ट्रॅक्शन आदी तांत्रिक निकषांवर मूल्यमापन केले जाते.
संघाने विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सेल्स सादरीकरणात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक, डिझाईन व ओव्हरऑल स्टॅटिकमध्ये द्वितीय क्रमांक, तर सीएई विश्लेषण, सस्टेनेबिलिटी, ड्युरॅबिलिटी, अ‍ॅक्सेलरेशन, सस्पेन्शन व ट्रॅक्शन तसेच ओव्हरऑल डायनॅमिक्स या विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळवत एकूण १० राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
या संघाचे नेतृत्व अर्षद सनदी यांनी केले. विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. एस. जे. रायकर यांचे प्रोत्साहन लाभले असून प्रा. दिपक सावंत व प्रा. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगत संघातील सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे व रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

 

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत सिद्धनेर्लीत ‘महाराजस्व’ अभियानातून सुशासनाचा जागर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विविध लाभांचे वाटप

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल मतदारसंघात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला गती देऊन येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘समाधान शिबीर टप्पा १’ चा शुभारंभ कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री म्हणाले, प्रत्येक घरात सौर ऊर्जा प्रकल्प बसविला तर ३ किलोवॅट च्या प्रकल्पासाठी प्रति प्रकल्प ७८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच; मतदार संघात घरोघरी पी. एम. सूर्यघर योजना राबवण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.                                                              यावेळी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक शेती अवजारांचे वाटप करण्यात आले, तसेच एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या स्टॉल्सचे अनावरण करून मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या. याप्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा डिजिटल साक्षर नसल्याने त्यांना ई-केवायसी सारख्या प्रक्रियेत अडचणी येतात; अशा वेळी प्रशासनाने केवळ औपचारिकता न पाळता लोकांचे प्रबोधन करावे आणि जागोजागी सुविधा निर्माण करून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. रेशन दुकानांवरील बोटाचे ठसे मशीनवर न उमटल्याने धान्य मिळण्यास होणारा त्रास दूर करून प्रत्येक लाभार्थ्याचे १०० टक्के समाधान अशा शिबिरातून करावे, असा सल्ला त्यांनी दिला.            कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात ज्या-ज्या पानंदी शेतकरी खुल्या करून देतील त्या सर्व पानंदी बळीराजा पानंद योजनेमध्ये बसवून तयार करणार. शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्व गावांमधील रस्ते यांत्रिकीकरणातून खुले केले जात आहेत आणि येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती उत्पादनात वाढ होत असल्याचा संदर्भ देत त्यांनी ऊस उत्पादन वाढल्याने कारखाने अधिक काळ चालतील आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असे नमूद केले.             या सोहळ्यात पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराजस्व अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, नागरिकांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य हेतू आहे. पुढिल महिनाभर या माध्यमातून विविध दाखले आणि योजनांचे लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले जातील, असे सांगून त्यांनी गावकऱ्यांना शाश्वत स्वच्छता आणि वृक्षलागवडीचा मंत्र दिला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘शासन आपल्या दारी’च्या धर्तीवर प्रशासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचत असल्याची ग्वाही दिली, तर समरजित घाटगे यांनी सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे महाराजस्व शिबीर हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.          कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप करण्यात आले. या शिबिरास अंबरीषसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सुयेशा घाटगे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील आणि उपसभापती इंद्रजीत पाटील, दिनकर वाडकर गुरुजी, सरपंच तथा प्रशासक दत्तात्रय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गट विकास अधिकारी, सिद्धनेर्ली मंडळातील सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानामुळे सिद्धनेर्ली आणि परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा उपलब्ध झाल्या आाहेत.

 

गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 

कोल्हाकपूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून उत्सव मल्टीपर्पज हॉल गोकुळ शिरगाव येथे महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळ, आयटक नॅशनल कौन्सिल सदस्या कॉ.बबली रावत, प्रा.स्मिता केरिमाने व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे मोठे योगदान असते. त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमध्येही महिला दूध उत्पादकांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला दुग्ध व्यवसायात सक्रियपणे काम करत असून त्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांनी मनापासून प्रयत्न केले तर दुग्ध व्यवसाय अधिक यशस्वी होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास पाहायला मिळतात. गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेली ‘नारी सन्मान विमा योजना’ ही महिला दूध उत्पादकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देणारी योजना ठरणार आहे.                                            पुढे ते म्हणाले, गोकुळ ही दूध उत्पादकांची मातृसंस्था आहे. महिला भगिनींच्या सहकार्यामुळेच संघाची वाटचाल अधिक मजबूत होत आहे. पुढील काळातही महिला दूध उत्पादकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी गोकुळ कटिबद्ध राहील. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता-भगिनींना माझ्याकडून आणि गोकुळ परिवाराकडून शुभेच्छा दिल्या.                                कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर “मी कोण?” या विषयावर कॉम्रेड बबली रावत यांनी व्यक्तिमत्वाची जाणीव, आत्मभान आणि समाजातील आपली भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या सत्रात “सोहळा आनंदी आयुष्याचा” या विषयावर प्रा. स्मिता केरीमाने यांनी सकारात्मक विचार आणि आनंदी जीवनशैली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच शाहीर सदाशिव निकम व सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला व विविध प्रभोधनात्मक व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोकुळ दूध संघ कर्मचारी व अधिकारी त्यांच्या सौभाग्यवती व कन्या उपस्थित होत्या.                           यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत मृण्मयी सातवेकर व प्रास्ताविक संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी तर संपदा थोरात यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करत असताना संघातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान व सहकार्य केले.                                                                     यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, रणजीतसिंह पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, कॉ.बबली रावत, पद्मजा आपटे, कॉ.स्मिता केरिमाने, कॉ.दिलीप पोवार, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, संघाचे अधिकारी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, डॉ.प्रकाश साळुंके, कर्मचारी पतसंस्था चेअरमन माधुरी बसवर, गीता मोरे, डॉ.अश्विनी गाणे, तुनजाराणी घाटगे, तुप्ती देसाई, पूजा चिंगरे, राजश्री खाडे,कविता मगदूम, रुपाली देसाई, शुभदा पाटील, सरिता चव्हाण, सरिता मदनाईक, तृप्ती मदने, शुभदा जोशी, सुनिता कांबळे, गीता उत्तुरकर, बाजीराव राणे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.

सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील गजबजलेल्या व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली उणीव भरून निघणार
सांगली, : पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घडामोडीत सयाजी हॉटेल्सने आपल्या ‘एफोटेल’ ब्रँडअंतर्गत ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ या नव्या हॉटेलच्या सुरूवातीची घोषणा केली आहे. सांगली–मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले हे हॉटेल सांगली शहरात सयाजी समूहाचा ठळक आणि योग्य वेळी झालेला प्रवेश दर्शवते. व्यापारी व कृषी क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार ब्रँडेड निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली कमतरता लक्षात घेता, ही नवीन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या हॉटेलच्या समावेशामुळे ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ हे महाराष्ट्रातील ‘एफोटेल’ ब्रँडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सरोला आणि नवी मुंबई येथील हॉटेल्स त्याच्या सिस्टर प्रॉपर्टीज् आहेत. या विस्तारातून सयाजी समूहाची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक बळकट होत असून टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मध्यम-उच्च दर्जाची आदरातिथ्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते.
एफोटेल बाय सयाजी, सांगली येथे एकूण ५९ सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अतिथी कक्ष/ रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत : १५ ग्रँड रूम्स (२८४ चौ. फूट), ३४ प्रीमियम ग्रँड रूम्स (३०९ चौ. फूट), ६ एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स (३७३ चौ. फूट), २ ग्रँड सूट्स (५०६ चौ. फूट) आणि २ प्रीमियम सूट्स (७६६ चौ. फूट). व्यवसायिक प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे.
या हॉटेलमधील भोजन व्यवस्था हीदेखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे दोन वेगवेगळे फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्स उपलब्ध आहेत—‘द क्यूब’, १२० आसन क्षमतेचे दिवसभर सुरू असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि ‘गुड ओल्ड डेज’, ३० पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.
या हॉटेलमध्ये ‘जार्डिन १’ आणि ‘जार्डिन २’ असे दोन बहुउपयोगी बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. ‘जार्डिन १’ सुमारे ४,२९५ चौ. फूट क्षेत्रफळाचा असून थिएटर पद्धतीच्या आसन व्यवस्थेत ३५० पाहुण्यांपर्यंत क्षमता आहे. तर ‘जार्डिन २’ चे क्षेत्रफळ २,३५५ चौ. फूट असून त्यात थिएटर पद्धतीने १५० पाहुण्यांची व्यवस्था करता येते. या सुविधांमुळे एफोटेल बाय सयाजी, सांगली हे शहरातील एमआयसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स) तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले प्रमुख ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सांगलीमध्ये उच्च दर्जाच्या बँक्वेट सुविधांची कमतरता असल्याने ही सुविधा शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी १४ वा दीक्षांत समारंभ : पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी १४ वा दीक्षांत समारंभ : पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे. माननीय कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी जागतिक कीर्तीचे लाईफ कोच, प्रेरणादायी वक्ते आणि बी.ए.पी.एस. स्वामीनारायण संस्थेचे पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी प्रमुख अतिथी असून ते दीक्षांत भाषण करतील. डी. वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथील मैदानावर सायंकाळी ५ वाजता या समारंभाला सुरुवात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून नॅक “ए प्लस प्लस’ व क्यूएस-आय गेज डायमंड अशी सर्वोच्च मानांकने प्राप्त केली आहेत. एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाने उच्च स्थान प्राप्त केले आहे. पीएच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय, परिचारीका, भौतिक उपचार व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी आरोग्य व पूरक सेवेत कार्यरत आहेत. विद्यापीठात सातत्याने नवनवीन संशोधन सुरु असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी यावेळी दिली.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले जीवन अध्यात्म आणि समाजसेवेसाठी अर्पण केले. स्वामीजींची प्रभावी व प्रेरक विचार आणि ओजस्वी वक्तृत्वशैली यांमुळे जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे.
गेल्या ३० हून अधिक वर्षांमध्ये त्यांनी १५ हजार पेक्षा अधिक जीवनविकास विषयक व्याख्याने दिली असून ३० हून अधिक देशांमध्ये लाखो व्यक्ती व नेत्यांना प्रेरित केले आहे. नेतृत्व, तणाव व्यवस्थापन, नैतिक मूल्ये, कौटुंबिक संस्कार, टीमवर्क आणि सर्वांगीण यश या विषयांवर त्यांचे मार्गदर्शन विशेष प्रभावी ठरले आहे. ते एक लोकप्रिय स्तंभलेखक असून अनेक दैनिकांमध्ये त्यांचे साप्ताहिक लेख प्रसिद्ध होतात. जागतिक स्तरावर सोशल मीडियावरही त्यांची प्रभावी उपस्थिती आहे. ते एक नामवंत लेखक देखील आहेत. “INSPIRED: DAILY WISDOM for HOLISTIC LIVING” हे त्यांनी अलीकडेच लिहिलेले पुस्तक प्रकाशित होताच काही तासातच अमेझोनवर ‘बेस्ट सेलर’ ठरले. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक मानद डॉक्टरेट पदव्या आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अमेरिका आणि कॅनडा येथील विविध शासकीय संस्थांनी त्यांना अनेक प्रतिष्ठित सन्मानपत्रे आणि गौरव प्रदान केले आहेत.

७४१ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

तेराव्या दीक्षांत समारंभात एकूण ७४१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी १७ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असून १४ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. जागिरदार, डॉ. विनय वाघ आणि डॉ. मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत. संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. तन्वी संजय देसाई यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिली.

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकासाच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ‘टियर-२’ शहर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील शिक्षणाचे आणि उत्तम आरोग्य सुविधांचे मोठे केंद्र आहे. कला, संस्कृती, क्रिडा क्षेत्रातही कोल्हापूरचा नावलौकिक आहे. मंजूर झालेले आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबमुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार आहेत. आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल. येत्या काळात कोल्हापूरात औद्योगिक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राची नवी क्रांती दिसून येईल. यासह इतर महत्वकांक्षी प्रकल्पाच्या निर्मितीतून कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.कोल्हापूरात मंजूर झालेल्या आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हब बाबत माहिती देण्याकरिता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित होता. याबाबत मी गत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले होते. सदर प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहास आश्वासित केले होते.कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने दि.०५ मार्च २०२६ रोजी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार शेंडापार्क परिसरातील गट क्रमांक ५८३, ५८७ आणि ५८८ मधील एकूण ३४.३६ हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना असून त्यातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल. कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे जाहीर आभार..!!
संस्थानातील जनतेने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि व्यापार-उद्योगात प्रगती करावी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या मिल्सला स्वत:ची जागा व आर्थिक पाठबळ देवून चालना दिली. अशा या पवित्र जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.राजर्षी शाहू महाराजांच्या या कार्यामुळेच कोल्हापूर हे आजही ‘रयतेची आणि शाहू महाराजांच्या विचारांची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. महाराजांनी ज्या उद्देशाने या मिल्सची स्थापना केली तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची, विचारांची प्रेरणा देणारे आणि व्यापार, उद्योगाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे स्मारक कोल्हापूरवासियांना अपेक्षित आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि करवीरसंस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इस्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक १००० ते १२०० आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, मिल्स शेजारी असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अँम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्याच्या सूचना मंत्रालयीन बैठकीत दिल्या आहेत. जेणेकरून या स्मारकाद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, उद्योग, कला क्षेत्राच्या उन्नतीसाठी असलेला उद्देश जपला जाईल.या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगलराय साळोखे, नगरसेविका कौसर बागवान, नगरसेविका अर्चना पागर, नेपोलीयन सोनुले, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख रणजित जाधव, सुनील जाधव, इंद्रजित आडगुळे, अनिल पाटील, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, उदय भोसले, राज जाधव, विनय वाणी, प्रभू गायकवाड, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.