भारतीय जनता पार्टीच्या बिहार व अन्य राज्यातील पोटनिवडणुकीच्या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव
कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार व अन्य राज्यातील निवडणुकीचे निकाल आज पहाटे स्पष्ट झाले. पोटनिवडणुकीत गुजरात, मध्य-प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवले. बिहार राज्यात ७४ जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. या विजया बद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो…नरेंद्र मोदी जैसा हो, भारत माता की जय अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. हलगीच्या तालावर ठेका धरत सर्वांनी हा आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी बोलताना सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, आजचा दिवस भारतीय जनता पार्टीसाठी आनंदाचा आहे. इतर सर्व पक्ष एकट्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे ठाकले होते. परुंतु बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले.
संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे आजचे यश उल्लेखनीय आहे. महात्मा गांधी यांनी कॉंग्रेस बरखास्त करा असे सांगितले होते हा त्यांनी दिलेला आदेश कॉंग्रेस नेते (राहूल गांधी) त्यांच्या कर्तुत्वाने आमलात आणताना दिसत आहेत. या विजयाबद्दल त्यांनी केंद्रीय नेत्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, आजचे निकाल भारतीय जनता पार्टीसाठी दिवाळीपूर्वी मिळालेली दिवाळी भेट असल्याचे नमूद केले. ही निवडणूक सर्व बाबतीत महत्वपूर्ण होती, गेली काही दिवस विरोधक भाजपा विरुद्ध एकवटले अनेक निष्कर्ष चाचणीमध्ये देखील विरोधकांचे सरकार येईल असा सर्वांचा निष्कर्ष होता. या आधारे एकप्रकारचे भाजपा विरोधी चित्र तयार करण्याचे काम सुरु होते. परंतु हे सर्व निष्कर्ष फेल ठरवत बिहारच्या जनतेने भाजपा व मित्र पक्षांना विजयी कौल दिला याबद्दल त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे असल्यामुळे आता देशातील जनतेनेच नरेंद्र मोदी यांना भारत देशाचे कणखर नेतृत्व मानले आहे. या निवडणुकी मध्ये अमितभाई शहा, जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मायक्रो प्लानिंग करून निवडणुकीमध्ये विजय संपादन केला याबद्दल अभिनंदन केले. या विजयामुळे भारतीय जनता पार्टीला नवचौतन्य प्राप्त झाले आहे.
याचधर्तीवर आगामी काळात भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विजय संपादन करण्याचा निर्धार या निमित्याने आपण सर्वांनी करूया असे सांगितले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, विजय अग्रवाल, चिटणीस प्रदीप उलपे, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, नगरसेवक विजय खाडे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, विशाल शिराळकर, मिलिंद कुलकर्णी, निलेश आजगावकर, सचिन जाधव, अभिजीत शिंदे, सुशांत पाटील, बापू राणे, इकबाल हकीम, अशोक लोहार, महादेव बिरजे, दिलीप बोंद्रे, नरेंद्र पाटील, विजय गायकवाड, शैलेंद्र जाधव, अमर साठे, मंगला निपाणीकर, शाहरुख गडवाले, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.