aawaz.com आता मराठीमध्ये,ओरिजनल ऑडिओ आणि पॉडकास्ट ऐका मराठीत
हिंदी आणि इंग्रजीबरोबर आता मराठी ऑडिओ शो ऐकता येणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : aawaz.com ऑडिओ प्रोग्रामिंग आणि पॉडकास्ट क्षेत्रात नवनवीन शिखर गाठत आहे. जानेवारी २०१९ पासून हिंदी आणि इंग्रजीमध्ये ८०० तासांचे ऑडिओ प्रोग्रामिंग केलेल्या aawaz.com ने, आता मराठी भाषेत उतरण्याची घोषणा केली आहे. सध्याच्या घडीला aawaz भारतातील ,१०० टक्के ओरिजनल कंटेंट देणारा, सर्वांत मोठा पॉडकास्ट प्लॅटफॉर्म आहे.
Aawaz च्या यूजर्सना आता ऍपवर किंवा वेबसाईटवर इंग्रजी आणि हिंदीसोबत मराठीतही प्रोग्राम ऐकता येणार आहेत. त्यासाठी केवळ त्यांना भाषा निवडायची आहे. सुरुवातीला मराठी यूजर्सना दहा मराठी ओरिजनल ऑडिओ शो ऐकता येणार आहेत. यामध्ये कथा, अध्यात्मिक कथा, मनोरंजन आणि मोटिवेशनल अर्थात प्रेरणादायी ऑडिओ प्रोग्राम ऐकायला मिळणार आहेत.
aawaz च्या मराठी यूजर्ससाठी दर आठवड्याला नवनवीन शो असणार आहेत. तसेच आताच्या शोचे नवीन एपिसोडही ऐकायला मिळणार आहेत. aawazही मुंबईतील आग्रह्या टेक्नॉलॉजी लिमिटेड यांची निर्मिती आहे. मराठी यूजर्ससाठी स्वतंत्र प्रोग्राम सादर करताना, कंपनीचे सीईओ श्रीरामन थियागराजन म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या भूमीत आमच्या कंपनीची सुरुवात झालीय, याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी एक नवा ऑडिओ प्रोग्रामिंग अनुभव सादर करताना, आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. आमच्या कंपनीसाठी ही एक खास क्षण आहे.’
यासंदर्भात aawaz चे को-फाउंडर आणि सीटीओ रिषभ वसा म्हणाले, ‘aawaz च्या नव्या प्रोग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राची अतुलनीय परंपरा आणि इतिहास मांडण्यात आलाय. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरील शोचा समावेश आहे. आमच्या संशोधनानुसार युजर्सना एन्टरटेन करणारा, कंटेट ऐकावासा वाटतो. आमच्याकडील ‘काउंटडाऊन : टॉप ५ मराठी वेबसीरिज्’, सेलिब्रिटी संवादमध्ये ‘मन मोकळे विथ मनिषा केळकर’, यांसारख्या शोच्या माध्यमातून युजर्सची आवड जपली जात आहे. मराठी यूजर्सना दर्जेदार कंटेंट देण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे.’
aawazविषयी थोडे
aawaz.com हा भारतीय भाषांमधील ऑडिओ प्रोग्रामिंग आणि पॉडकास्टचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत या प्लॅटफॉर्मवर जवळपास ८०० तासांहून अधिक उच्च दर्जाचे ओरिजनल ऑडिओ प्रोग्राम झाले आहेत. यात २ हजार १७० शो आणि त्यांचे एकूण ५ हजार ८०० एपिसोड झाले आहेत. aawaz.comयुजर्ससाठी ऍप आणि वेबसाईट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोर, ऍपल ऍप स्टोअर, कायओएस (जीओ फोन), इंडसओएस ऍप बझार, ऍमेझॉन फायर टीव्हीस्टिक आणि जिओ एटीबीवर aawaz चे ऍप उपलब्ध आहे. ओला प्ले, ऍमेझॉन ऍलेक्सा आणि स्पॉटिफायवर aawazचे काही निवडक शो ऐकायला मिळतील.