गोकुळ दूध संघ व दूध संस्था कर्मचारी संघटना यांच्याकडून दूध संस्था कर्मचा-यांना आर्थिक दिलासा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेने कोविड – १९ निधी उभारण्यात आला असून या योजनेत सहभाग घेतलेल्या प्राथमिक दूध संस्थांमध्ये काम कर्मचा-यांना नुकसान भरपाई पोटी रुपये ९ लाख ५० हजार इतक्या रक्कमेचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील कार्यालयात करण्यात आले.
या कोरोना कवच निधीसाठी चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने गोकुळ दूध संघाने १५ लाख इतकी आर्थिक मदत दिली असून,योजनेत सहभाग घेणेसाठी संघटनेने संस्था कर्मचा-यांकडून प्रत्येकी रुपये ३००/- तर दूध संस्थेकडून प्रति कर्मचारी रुपये ३००/- इतका निधी घेतला आहे. या योजने अंतर्गत एखाद्या कर्मचा-यास कोरोनाची लागण झाल्यास त्यावरील उपचाराकरीता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुपये १०,०००/- तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुपये ३०,०००/- व दुर्देवाने कोरोनामुळे कर्मचा-याचा मृत्यु झाल्यास रुपये १ लाख रुपये, इतर शस्ञक्रीयेसाठी १५,०००/- तर नैसर्गीक किंवा इतर कारणांमुळे मृत्यु झाल्यास २५,०००/- इतकी नुकसान भरपाई दिली जाते . यामध्ये जिल्ह्यातील दूध संस्थेमधील ४१ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचाराकरीता एकुण रुपये ६ लाख २० हजार या पैकी एका कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यामुळे रुपये १ लाख असे एकूण ७ लाख २० हजार , इतर शस्ञक्रीयेसाठी २ कर्मचा-यांना ३०,०००/- व नैसर्गीक किंवा इतर कारणांमुळे ८ कर्मचा-यांचा मृत्यु झाल्यामुळे प्रत्येकी २५,०००/- प्रमाणे २,००,०००/- असे एकुण ९ लाख ५० हजार इतक्या रक्कमेचे वितरण करण्यात आले व सेवा निवृत्त तीन कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.रणजितसिंह पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक श्री.विश्वास पाटील (आबाजी), श्री.अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक श्री.विश्वास जाधव, संचालक श्री.बाळासो खाडे, श्री.उदय पाटील, संचालिका सौ.अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक श्री.डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी श्री.एस.एम.पाटील, दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.के.डी.पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, दत्ताञय बोळावे, सुभाष गुरव इतर अधिकारी संस्था प्रतिनिधी उपस्थिती होते.तसेच गोकुळ दूध संघाकडून ११% डिव्हीडंड पोटी होणारी रक्कम रुपये ५ कोटी ३ लाख २५ हजार दूध संस्थांच्या खात्यावर दि.०६/११/२०२०.रोजी वर्ग करण्यात आली आहे.