श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किरणे पोहोचली देवीच्या गुडघ्यापर्यंत
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री अंबाबाई चे किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली थंडीचे दिवस व ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रताही कमी जाणवली श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा होतो या वर्षातील दुसरा किरणोत्सव सोहळा हा रविवारपासून सुरू झाला पहिल्या दिवशी किरणे पितळी उमर्यापर्यंत येउन लुप्त झाली होती. दुसऱ्या दिवशी सोमवारी या किरणांची तीव्रता चांगली होती त्यामुळे ती देवीचे गुडघ्यापर्यंत पोहोचली मंगळवारी ही किरणे देवीच्या कमरेपर्यंत येण्याची शक्यता आहे.