Friday, November 22, 2024
Home ताज्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इलेक्ट्रोकेमिकल सुपरकपॅसिटरला पेटंट

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इलेक्ट्रोकेमिकल सुपरकपॅसिटरला पेटंट

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इलेक्ट्रोकेमिकल सुपरकपॅसिटरला पेटंट

कोल्हापूर /प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या “इलेकट्रोकेमिकल सुपरकपॅसिटर डिव्हाइस’ला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे २६ वे पेटंट आहे.
विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १५ ते २० वर्षापासून ऊर्जा साठवणुकीच्या पद्धतीवर संशोधक टीम सातत्याने काम करत आहेत. संशोधकानी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुक डिव्हाइसला २१ ऑगस्ट २०२३ रोजी पेटंट मंजूर झाले आहे. २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केले जाईल.
मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, तयार केलेले सुपरकपॅसिटर डिव्हाइस ऊर्जा साठवण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे. भारतातील युवा संशोधकांनी उच्च दर्जाचे ऊर्जा साठवणूकी करता साधने तयार करण्यासाठी संशोधावर भर द्यावा. भारतीय इलेक्ट्रॉनिक व टेलीकम्युनिकेशन बाजारपेठेमध्ये हे संशोधक नक्कीच आमूलाग्र बदल घडवून आणतील.या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी डॉ. प्रिती बागवडे, डॉ. धनाजी माळवेकर, संभाजी खोत आणि रणजित निकम यांचा सहभाग होता.
पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments