Thursday, November 21, 2024
Home ताज्या एज्युकेशन टु डे च्या २०२३ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नंबर वन स्कुल म्हणून...

एज्युकेशन टु डे च्या २०२३ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नंबर वन स्कुल म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची निवड

एज्युकेशन टु डे च्या २०२३ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नंबर वन स्कुल म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची निवड

अतिग्रे/प्रतिनिधी : एज्युकेशन टु डे च्या २०२३ च्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल डे कम बोर्डिंग स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्कूल ठरले आहे. त्याचसोबत उत्कृष्ट शिक्षण संस्थापक म्हणून श्री संजय घोडावत यांनाही सन २०२३ चा एज्युकेशन टु डे चा पुरस्कार या कार्यक्रमात प्राप्त झाला.
एज्युकेशन टुडेने दि ४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल द ललित, येथे ‘महाराष्ट्र स्कूल मेरिट अवॉर्ड्स, २०२३’ या सर्व टॉप स्कूल विजेत्यांचा व उत्कृष्ट शिक्षण संस्थापक यांच्या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल चे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.
४०० हून अधिक शाळांच्या सर्वेक्षण फॉर्ममधून टॉप स्कूल्सची निवड करण्यात आली. शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची गुणवत्ता व योग्यता , सहशालेय अभ्यासक्रम, क्रीडा शिक्षण, डिजिटल लर्निंग, विद्यार्थ्यांची प्रगती आणि गुणवत्ता, अध्ययन- अध्यापन गुणवत्ता, व्यवस्थापनातील नेतृत्व, पालकांचा सहभाग, भविष्यास उपयुक्त शिक्षण या १५ मूल्यांकन निकषांवर शाळांचे वर्गीकरण करण्यात आले. पायाभूत सुविधा, सामाजिक सेवा, समग्र व आधुनिक शिक्षण, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय कल्याण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि एकात्मिक शिक्षण या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलची निवड करण्यात आली. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकामध्ये राहिले. परीक्षकांचे गुण, पालकांची मते व एज्युकेशन टुडे टीमचे सर्वेक्षण यावर आधारित हा निकाल जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्कूल म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला बहुमान प्राप्त झाला. या पुरस्काराबद्दल चेअरमन श्री संजय घोडावत यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती व सर्व शिक्षक शिक्षिका यांचे कौतुक व अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments