Friday, October 25, 2024
Home ताज्या महानगरपालिकेत घरफाळा घोटाळाबाबत हलगी वाजवत व मर्दानी खेळ सादर करत करण्यात आली...

महानगरपालिकेत घरफाळा घोटाळाबाबत हलगी वाजवत व मर्दानी खेळ सादर करत करण्यात आली निदर्शने

महानगरपालिकेत घरफाळा घोटाळाबाबत हलगी वाजवत व मर्दानी खेळ सादर करत करण्यात आली निदर्शने

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली वर्षभर कोल्हापूर महानगरपालिकेत घरफाळा घोटाळा प्रकरण गाजत आहे. कित्येक कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. या घोटाळयामुळे महापालिकेचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे, महापालिका आर्थिक अडचणीत आली असून त्याचा सार्वजनिक विकास कामांवर परिणाम झाला आहे.
महापालिका ही कोल्हापूरच्या जनतेची असून समस्त जनता तिचे मालक आहेत व
अधिकारी, कर्मचारी हे जनतेचे लोकसेवक आहेत असे असताना काही लोकसेवकच यामध्ये
घरभेदी आहेत घोटाळेबाज आहेत असे आयुक्त यांना निदर्शनास आणून दिले आहे. या घरभेदयानी कोटयावधी रुपयांची धनदांडग्या मिळकत धारकांना भ्रष्टमार्गाने घरफाळयात सवलती दिल्या असून त्यातून आपली कमाई केलेली आहे.
याउलट सामान्य जनता काळजीपूर्वक आपला सर्वच्या सर्व घरफाळा भरत आहे. त्यांच्यावर फार मोठा अन्याय होतोय आणि आमची महापालिकाही दिवाळखोरीत निघत आहे हे सत्य जगाला माहित आहे.
याबाबत वारंवार अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी घरफाळयाबाबत एकमेकावर जाहीर
आरोप प्रत्यारोप करुन चिखलफेक करीत आहेत कोटी कोटी रुपयांचे अब्रु नुकसानीचे दावे ठोकत
आहेत यासाठी इतके पैसे यांचेकडून आले कोठून हा संशोधनाचा भाग आहे. कित्येक वेळा
करनिर्धारक जाहीरपणे वृत्तपत्रातून बोलतात आरोप सिध्द करुन दाखवा म्हणजे यांनी ज्यांची
महापालिका आहे त्या नागरिकांना विचारातच घेतलल दिसत नाही इतके हे लोक निर्दावलेले
आहेत.
याबाबत आम्ही दि. २३ जून २०२० रोजी मा. आयुक्तसो यांना यासंबंधी शिष्टमंडळासह
भेटून विस्तृत निवेदन देऊन सन २००१ ते आज अखेर निवृत्त न्यायाधीशांमार्फत घरफाळा
विभागाची चौकशी करुन श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली होती यावर प्रशासनाने दोन महिन्यात घरफाळा विभागाची पूर्ण चौकशी करुन अहवाल जनतेपुढे जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. पण आज चार महिने झालेत यावर प्रशासन काहीच उत्तर देत नाही आम्ही वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरुपात याबाबत विचारणा करीत असताना चौकशी चालू आहे, समिती नेमली आहे अशी जुजबी उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न चालू आहे. दहा दिवसापूर्वी आम्ही लेखी विचारणा करुन आपण याबाबत आमचे समवेत बैठक घेऊन याबाबत काय काय कारवाई झाली आहे ते सांगावे असे कळवूनसुध्दा यावर ठोस असे काहीच उत्तर देत नाहीत या पत्रात आम्ही त्यांना सात दिवसाची अंतिम मुदत देऊन यानंतर आम्हाला आमची महापालिका वाचविण्यासाठी आत्मक्लेश, आत्मदहन, जलसमाधी, रास्तारोको इ. सारखी आंदोलने करावी लागतील असा इशारा दिला होता तरीही हे प्रशासन जागे होत नाही म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालतय की काय म्हणून आम्ही आज या प्रशासनाला जाग आणण्यासाठी पहिला टप्पा म्हणून निदर्शने करीत आहोत यातून प्रशासन जागे झाले नाही तर तीव्र आंदोलन आम्हाला करावे लागेल व त्याचा बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील याची नोंद घेवून आमच्या मागणीची पुर्तता करावी ही विनंती.अशी मागणी करण्यात आली.
ही निदर्शने संपल्यानंतर घरफळा चौकशी प्रमुख उपायुक्त निखील मोरे यांनी निवेदन स्वीकारून तीन आठवड्यानंतर समितीबरोबर बैठक घेऊन सर्व प्रकारच्या चौकशी समितीचे खुलासे करतो असे आश्वासन दिले आहे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, कोल्हापूर रमेश मोरे अशोक पवार भाऊ घोडके चंद्रकांत पाटील महेश जाधव सुनीता पाटील सुवर्णा मिठारे विद्या पवार पूजा पाटील अनिता जाधव सुजाता खराडे संभाजी जगदाळे रणजित पवार लहुजी शिंदे गीता हसुरकर शंकरराव शेळके शिवमुर्ती झगडे उमेश कोरलेकर राजू मालेकर उमेश भोसले प्रकाश नाईक बापू आवळे श्रीधर जाधव आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments