Wednesday, September 11, 2024
Home ताज्या पाटगांव११ नोव्हेंबर २०२० रोजी श्री.क्षात्र जगतगुरु पीठाची स्थापनेस १०० वर्षे पूर्ण,विविध उपक्रमाचे...

पाटगांव११ नोव्हेंबर २०२० रोजी श्री.क्षात्र जगतगुरु पीठाची स्थापनेस १०० वर्षे पूर्ण,विविध उपक्रमाचे आयोजन

पाटगांव११ नोव्हेंबर २०२० रोजी श्री.क्षात्र जगतगुरु पीठाची स्थापनेस १०० वर्षे पूर्ण,विविध उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी ११ नोव्हेंबर १९२० रोजी, श्री क्षात्र जगतगुरु पीठाची स्थापना केली. या घटनेस १०० वर्षे पूर्ण होत असून ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची अन अभिमानाची गोष्ट. यानिमित्त श्री क्षात्र जगतगुरु पीठ, पाटगांव यांच्या माध्यमातून हे वर्ष अनेक समाजाभिमूख उपक्रमांनी साजरे करण्याचे ठरविले आहे अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी व संजय बेनाडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीमत क्षात्र जगतगुरु महाराजांच्या विचारांचा देशात सर्वदूर प्रचार व प्रसार होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्य प्रामुख्याने करण्यात येणार आहे. याचबरोबरीने समाजाला स्वावलंबी तसेच सुसंस्कृत करणारे व आजच्याकाळानुरुप बदल स्विकारुन विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन संपूर्ण वर्षभर श्री क्षात्र जगतगुरु पीठा मार्फत करण्यात येणार आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या समाजाची सुधारणा आपणच केली पाहीजे व त्यासाठी सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची मशाल दाखविली पाहीजे असा उद्देश ठेवला होता. त्यानूसार समाजातील तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावाचून मार्ग नाही आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन टिकून राहील्यास प्रगती होते, हे जगदगुरु महाराजांचे सुत्र होते. यास अनुसुरुनच समाजातील प्रत्येक वर्गास उपयुक्त आणि प्रगतीपथावर देणारे विविध उपक्रम या शतकमहोत्सवी वर्षात आयोजित करण्यात आले आहेत असे यावेळी सांगण्यात आले.
या शतकमहोत्सवी वर्षानिमित उपक्रमाची संक्षिप्त माहिती अशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री संत मौनी महाराज यांची समाधी असणाऱ्या पाटगांव स्थित मौनी महाराज मठाचे व श्रीमत क्षात्र जगतगुरु पीठ यांचे पुन:रुज्जीवन करणे व या प्रवाहात समाजातील सर्वसामान्य लोकांना सहभागी करून हे कार्य लोकसहभागातून पूर्णत्वास नेणे.
मठासमोरील नगारखान्याचे पुनःरुज्जीवन करणे श्रीमत् क्षात्रजगतगुरु महाराजांच्या स्मृतीग्रंथाचे प्रकाश करणे श्री संत मौनी महाराज तसेच श्री क्षात्र जगत्गुरुः पीठ यावर सध्या असणारे अनेक भाविक तसेच या जागेविषयी ओढ असणारे अनेक पर्यटक इथे येतात त्यांच्यासाठी अन्नछत्र सुरू करणे.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज व श्रीमत क्षात्र जगतगुरु: यांच्या विचारांचा महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे. व्‍यवसायविषयक संधीच्या कमतरतेमुळे तराणाईचा शहराकडे ओढा असलेले अनुभवास येते. पण अशा वेळी पाटगाव व त्या परिसरातील जैव विविधता समजून घेऊन पर्यटन विषयक गोष्टींना चालना देणे. बदलत्या काळानुसार सेंद्रिय उत्पादनांना वाढणारी मागणी लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनवृध्दीसाठी प्रयत्न करणे.
पाटगाव मधासाठी संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. त्यामुळे मधुमाशा पालन शात्रीय पध्दतीने करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे. ग्रामस्थांसाठी उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करून एका स्वयंपूर्ण गावाची निर्मिती करणे
समाज सुसंस्कारीत बनवायचा असेल तर त्यास अध्यात्मिक जोड देणे आवश्यक असते अशावेळी अध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त व विस्तृत ग्रंथालयाची उभारणी करणे ज्‍याव्दारे वाचन संस्कृतीवाढीसाठी प्रयत्नशील रहाणे पाटगांव व त्याजवळील प्रदेश हा डोंगराळ तसेच ग्रामीण घाटणीचा असल्याने येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची कमतरता जाणवते अशावेळी त्यांना उच्च गुणावत्ता असणारे शिक्षण मिळण्यासाठी सुरु असणाऱ्या प्रयत्नांना अधिक प्रभावीपणे राबविणे तसेच गुरुकुलांची स्थापना करणे.
तरुण पिढी ही देशाची ओळख असते त्यामुळे या तरुणाईला विविध व्यवसायांसंबंधी तसेच नोकरी विषयक संधींबाबत मार्गदर्शन करणे,समाजाला स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीकोनातून लघुउद्योगांबाबत मार्गदर्शन तसेच निर्माण होणाऱ्या मालास बाजारपेठ मिळवून देऊन त्यांना उज्वल भविष्य निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे,खऱ्या अर्थानं समाजात महिलांना अनन्य साधारण महत्व असते. त्यांना घराचा कणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे अशा माता-भगीनींना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
पाटगांव येथील पंचक्रोशीचा सहभाग प्रामुख्याने कृषी संपन्नतेत होतो. अशावेळी कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना तज्ञ लोकांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक असणाऱ्‍या विविध शिबीरांचे आयोजन तसेच सामूहिक तत्वावरील शेती याविषयी योग्य मार्गदर्शन करणे, ग्रामीण भाग असल्याने आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करणे तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांना करुन देणे व त्याचा लाभ कशा पध्दतीने घेता येईल यासाठी तज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे.
महेंद्रसिंह बेनाडीकर हर्षल बेनाडीकर अश्विनी बेनाडीकर शिवजीत बेनाडीकर मनजीत बेनाडीकर विनीत बेनाडीकर सुजीत मोहिते इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments