जनावरे रस्त्यावर न सोडण्याचा-बेपारी समाजाचा निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी : बेपारी समाजाच्यावतीने रस्त्यावर जनावरे मोकाट सोडणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याची ग्वाही बेपारी समाजाचे अध्यक्ष तन्वीर बेपारी यांनी आज महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
वाहतुकीस अडथळा ठरणारी भटकी जनावरे पकडून त्यांना पाजंरपोळ संस्थेत सोडण्यासाठी महापालिकेने धडक मोहिम हाती घेतली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून बेपारी समाजाकडून रस्त्यावर भटकी जनावरे सोडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच प्रसंगी अपघातही होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन शाहूपूरी पोलिस स्टेशनच्या सहाय्याने बेपारी समाजाची बैठक घेतली. या बैठकीत बेपारी समाजाच्या वतीने रस्त्यावर मोकाट जनावरे न सोडण्याचा निर्णय घेतला गेला.