रंगनाथ हॉस्पिटल ला “एनएबीएच” मानांकन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचा अभ्यासक्रमही उपलब्ध
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी रिसर्च सेंटर अशी ओळख असलेल्या रंगनाथ हॉस्पिटलला “एनएबीएच”हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाले आहे सर्वोत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या हॉस्पिटलला या मानांकनाने गौरवले जाते अशी माहिती प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी तज्ञ डॉक्टर रवींद्र हेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेली दोन वर्षे विविध निकषानुसार या मानांकनासाठी हॉस्पिटलची पाहणी केली जात होती अशा पद्धतीने मानांकन मिळालेले रंगनाथ हे कोल्हापुरातील पहिलेच मेटरनिटी नर्सिंग होम असल्याचे त्यांनी सांगितले.
१९९१ साली सर्वात पहिल्यांदा लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया कोल्हापूरात या हॉस्पिटलमध्ये यशस्वी केली त्यानंतर आजवर वीस हजारांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असल्याचे डॉक्टर हेंद्रे यांनी यावेळी सांगितले. हॉस्पिटलमध्ये आजवर अनेक तज्ञ आणि सर्जन यांनी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया चे प्रशिक्षण घेतले आहे या अनुभवाच्या जोरावर आता ही मंडळी दुर्बीण शस्त्रक्रिया पारंगत झाली आहेत त्याची दखल नाशिकच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने घेतली असून या युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रंगनाथ हॉस्पिटलची निवड झाली आहे.
हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या या प्रशिक्षण केंद्रात आता फेलोशिप इन मिनिमल अँक्सेस सर्जरी इन गायनॅकलॉजि हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे रोजी असणाऱ्या एमडी गायनॅकलॉजि असणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी येथे प्रवेश मिळणार आहे. सध्या या ठिकाणी दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांना प्रशिक्षण दिले जात आहे लवकरच पुण्यातील तज्ञ प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून हॉस्पिटल मध्ये कॉस्मेटिक विभाग सुरू होणार असल्याचे डॉ. हेंद्रे यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉक्टर राधिका मोहिते, मुजममिल पटेल उपस्थित होते.