ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी छत्रपती संभाजीराजेंनी केले अभिवादन
पुणे/प्रतिनिधी : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या जयंती निमित्त शाहू महाराजांनी पुणे येथे स्थापन केलेल्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणातील शाहू महाराजांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून छत्रपती संभाजीराजे यांनी अभिवादन केले.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी १९१७ साली स्थापन केलेली संस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचे व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या कार्याचे चिरंतन स्मारकच आहे. इथेच शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले अश्वारूढ स्मारकही उभारले आहे.
“राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना बाजूला ठेवून कोणीही राजकारण करू शकत नाही, छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहून सर्वांनी काम करावे.” अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
“राजर्षी शाहू महाराजांनी समता, बंधुता , शिक्षण क्षेत्रात बहुजनांचे कल्याणकरत लोककल्याणकारी राज्य साकारले, त्याच आदर्श विचारांवर कामकाज करायला हवे.” असे स्वराज्य चे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी म्हटले.
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत स्वराज्य चे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, AISSPMS संस्थेचे सचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, भगवान साळुंखे, साहेबराव जाधव, सचिन कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व स्वराज्य चे पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.