Thursday, November 21, 2024
Home ताज्या येत्या वर्षभरात पाच लाख लोकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प - समर्थ सोशल फाउंडेशन...

येत्या वर्षभरात पाच लाख लोकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प – समर्थ सोशल फाउंडेशन चे प्रवर्तक सादिक शेख महाराष्ट्र – कर्नाटक – गोवा मधील पीआरओ मेळाव्यात  निर्धार

येत्या वर्षभरात पाच लाख लोकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प – समर्थ सोशल फाउंडेशन चे प्रवर्तक सादिक शेख

महाराष्ट्र – कर्नाटक – गोवा मधील पीआरओ मेळाव्यात  निर्धार

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्लोबल  ते लोकल समाज समोर वाढत असलेल्या व व्यसन आणि मधुमेह संकट  चा समर्थपणे यशस्वी  सामना करण्यासाठी  समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्री फील हेल्थ मिशन  संयुक्त पणे सुसज्ज आहे , आज   राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध पुरस्काराने सन्मानित होत असलेल्या १५१ पी. आर.ओ कार्यकर्ते व टीम  समवेत आगामी वर्षात पाच लाख व्यक्तींना व्यसनमुक्त मधून मुक्त करण्याचा निर्धार मुख्य प्रवर्तक सादिक शेख यांनी व्यक्त केला .  समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने गेली सात वर्षे व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती यासाठी  संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात इत्यादी ठिकाणी व्यसनमुक्तीचं आणि मधुमेह मुक्तीचे काम  उल्लेखनीय सुरू आहे.आता पर्यंत ५ लाख व्यक्तीची व्यसने बंद केली आहेत.त्यांना व्यसनमुक्त करून त्यांना सुखी जीवन जगता येत आहे.आज यासाठी पुढे येऊन काम केलेल्या १५१ जणांचा सहकुटुंबं स्मृतिचिन्ह देवून सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कराडचे नायब तहसीलदार  विजय माने  यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्यसनमुक्ती दूत यांचा सन्मान करण्यात आला . समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्टचे सर्वेसर्वा सादिक शेख  यांनी याप्रसंगी बोलताना संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून आपल्याला मधुमेहाचा आणि व्यसनमुक्तीचं काम जोरदारपणे करायचे आहे. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत तसेच दोन लाखापेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त केलेले आहे. हे काम अव्यातपणे चालू ठेवण्यासाठी समर्थ सोशल कटिबद्ध आहे असे भावूकतेने नमूद केले . यावेळी समर्थ सोशल फाउंडेशन सोबत पीएनबी मेट लाइफ सोबत काम करण्याचे ठरले आहे. यावेळी पीएनबी मेटलाइफ चे कोल्हापूरचे ब्रांच मॅनेजर नारायण पवार यांनीही नवी संयुक्त  पाऊलवाट व्यसनमुक्ती आणि मधुमेह यासाठी भविष्यकाळात एक महामार्ग ठरेल असा आशावाद व्यक्त केला . यावेळी शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे सागर देसाई , मध्यप्रदेश चे  स्वामी वासुदेवानंदजी , विकास पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रा सह कर्नाटक गोवा राज्यातून सहकुटुंब – स ह  परिवार सत्कारमूर्ती आणि त्यांचे परिवार उत्साही वातावरणात भगवे फेटे बांधून उपस्थित होते .मान्यवरांच्या अनुभव आणि मार्गदर्शनातून आगामी काळात सर्वांनीच व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी अधिक वेगाने काम करण्याची सामुदायिक रित्या निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments