औरंगजेबाचे उदात्तीकरण केलेल्या केआयटी च्या प्राध्यापिकेचे निलंबन करावे या मागणीसाठी अभाविप आक्रमक
आक्रमक अभाविप कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी केली अटक
कोल्हापूर/प्रतिनिधी : के आय टी कॉलेज मध्ये १६ जूनला वर्गात शिकवत असताना ” औरंगजेब चांगला होता आणि पाटील, देशमुख, कुलकर्णी बलात्कारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केले, याबाबत चा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता, या प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल व्हावा व कॉलेजने निलंबन, बरडतर्फची कारवाई करावी अशी मागणी अभाविप ने केली, कॉलेज मधील विद्यार्थ्यांना निवेदन द्यायला बाहेर येण्यापासून रोखले जात आहे असा आरोप अभाविप कार्यकर्त्यांनी केला, जोपर्यंत त्या प्राध्यापिकेचे निलंबन होत नाही तोपर्यंत प्राचार्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करणार असा पवित्रा महानगर सहमंत्री स्वप्नील यांनी घेतला, प्राध्यापिकांना लवकरात लवकर अटक करावी असे प्रसाद लष्कर म्हणाले, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या दालनात “औरंग्या की कबर खुदेगी छत्रपती की धरती पे, भारत माता की जय” अशी जोरदार घोषणाबाजी केली, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला नेले. यावेळी महानगर सहमंत्री स्वप्नील पाटील, जिल्हा सहसंयोजक प्रसाद लष्कर, निशिगंधा कुलकर्णी, अजय इटकी,वेदांत कुलकर्णी, तृप्ती ऐतवडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.