Thursday, November 21, 2024
Home ताज्या डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीनी घेतली फाउंड्रीमधील कामाची माहिती

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीनी घेतली फाउंड्रीमधील कामाची माहिती

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीनी घेतली फाउंड्रीमधील कामाची माहिती

झंवर ग्रुपच्या सहकार्याने इंडस्ट्रियल टूर

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थिनिनीची झंवर ग्रुपच्या सहकार्याने कस्तुरी फाउंड्री येथे एक दिवसीय इंडस्ट्रियल टूर आयोजित होती. मेकॅनिकल इंजिनीअर्सनी फाऊंड्री, रोबोटिक्स, फाउंड्रीमधील ऑटोमेशन आणि मशीन शॉप्सच्या प्रगत संकल्पना यावेळी समजावून घेतल्या. झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया नीरज झंवर वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले.
कस्तुरी फाउंड्री येथील उद्योग तज्ञांच्या नेतृत्वाखाली संवादात्मक सत्रे, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक कामाचा अनुभव विद्यार्थिनीना घेता आला. फाउंड्रीमधील कास्टिंग प्रक्रिया, साचा बनवणे आणि गुणवत्ता नियंत्रण तंत्र आदी प्रगत संकल्पनांची ओळख करून देण्यात आली. फाउंड्री उद्योगातील रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचे प्रयोग आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व यावरही चर्चा झाली.
झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया नीरज झंवर यांनी मार्गदर्शन केले. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आव्हानांना पेलण्यासाठी मुलींच्या अंगी लवचिकता, चिकाटी , जिद्द असणे गरजेचे आहे. कोणतीही समस्या न डगमगता प्रभावीपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा तसेच निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याचा नेहमी प्रयत्न करावा असे आवाहन त्यानी केले.
झंवर ग्रुप आणि डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी तंत्रज्ञान हस्तांतरण आणि अर्थपूर्ण सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. झंवर ग्रुपने उत्पादन क्षेत्रातील त्यांच्या वैविध्यपूर्ण उद्योगांमधून आठ प्रोजेक्ट्स महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि कंप्युटर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमासाठी मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. सुनिल रायकर, झंवर ग्रुपचे ओंकार जोशी व निनाद पोवार यांनी पुढाकार घेतला. यावेळी झंवर ग्रुपचे कार्यकारी संचालक नीरज झंवर, सौ. जिया झंवर, रोहन झंवर, अंकिता झंवर, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता , प्राचार्य एस. डी. चेडे , डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्रा. योगेश चौगुले , निलेश कुंभार, पंकज नंदगावे, डॉ. गणेश पाटील, अजिंक्य यादव, रंजिता जाधव उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील व पृथ्वीराज संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments