Sunday, January 19, 2025
Home ताज्या पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ - कॉंग्रेस वतीने इच्छुक उमेदवाराची मुलाखती पूर्ण

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ – कॉंग्रेस वतीने इच्छुक उमेदवाराची मुलाखती पूर्ण

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ – कॉंग्रेस वतीने इच्छुक उमेदवाराची मुलाखती पूर्ण

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुक महाविकास आघाडीच्यावतीनं एकत्रित लढविली जाणार आहे. पुणे मतदार संघातील कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इच्छुक असणार्या उमेदवारांच्या मुलाखती आज कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांनी घेतल्या.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, नामदार विश्वजीत कदम, ऑब्जर्वर सोनल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात सत्ता असलेल्या महाविकास आघाडीच्यावतीनं विधानपरिषदेच्या शिक्षक व पदविधर मतदार संघाची निवडणुक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतलाय. कॉंग्रेस पक्षाच्यावतीनं ही निवडणुक लढवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती आज दुपारी कोल्हापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात पारदर्शक पद्धतीनं पार पडल्या.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह दुपारपासूनच कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक घोषणाबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन करत होते. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, नामदार विश्वजीत कदम, ऑब्जर्वर सोनल पटेल, मोहन जोशी यांनी इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्न विचारून त्यांची मते आजमावून घेतली.
शिक्षक मतदार संघातून ११ जण इच्छुक असून त्यामध्ये कोल्हापुरातील कर्णसिंह सरनोबत, भरत रसाळे, रेखा पाटील, दादासो लाड, बाबासो पाटील, जयंत आजगावकर, तानाजी नाईक जत मधील सुजाता चौखंडे माळी, शिरोळ मधील खंडेराव जगदाळे, पुणे येथील जी.के.थोरात व प्रकाश पाटील यांचा समावेश आहे.
तर पुणे पदवीधरसाठी कोल्हापुरातील भरत रसाळे, इचलकरंजीतील शशांक बावचकर तर पुणे येथील डॉ. राजेंद्र खेडेकर यांचा समावेश आहे.आज पार पडलेल्या मुलाखतीनंतर दोन्ही मतदारसंघासाठी योग्य उमेदवारी कोणाला द्यायची याबातचा निर्णय वरिष्ठ पातळीवर करण्यात येणार आहे. त्यामुळं उमेदवारी कोणाला मिळणार याची धाकधुक इच्छुकांसह समर्थकांना लागून राहिली आहे.
यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी.एन. पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतूराज पाटील, राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, दिनकरराव जाधव, देविदास बन्साळी, संदीप कुमार, सरलाताई पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments