Saturday, January 11, 2025
Home ताज्या मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव मोहीम आता राज्यभर; शासन...

मास्क नाही तर प्रवेश नाही’ कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव मोहीम आता राज्यभर; शासन परिपत्रक प्रसिध्द

मास्क नाही तर प्रवेश नाही’ कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव मोहीम आता राज्यभर; शासन परिपत्रक प्रसिध्द

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : (जिल्हा माहिती कार्यालय): ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाने काल २ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ‘ मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही’ अशी अभिनव मोहीम सुरु केली. यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिले आहेत.
या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत ‘बेस्ट’ च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत. ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी काल २ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.
नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शासन परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. यासाठी सर्व महानगरपालिका/ नगरपरिषदा/ नगरपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी. यामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिध्दी विविध माध्यमांव्दारे करणे. जसे जागोजागी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त/ मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेवून मोहीम राबविण्यात यावी. मोहीम राबविताना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा. या उपरोक्त जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. मास्क नाही प्रवेश नाही याबाबत विशेष मोहीम राबवावी.
हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक 202011021600541325 असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments