Friday, October 25, 2024
Home ताज्या गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची खा.छत्रपती संभाजीराजे यांची गोवा...

गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची खा.छत्रपती संभाजीराजे यांची गोवा मुखमंत्री यांच्याकडे मागणी

गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची खा.छत्रपती संभाजीराजे यांची गोवा मुखमंत्री यांच्याकडे मागणी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : “छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री गोवा यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल.
यावर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजेंना सांगितले की, आपली मागणी अगदी रास्त असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. हा विषय आजपर्यंत माझ्या लक्षात आला नव्हता. आपण जे म्हणता आहात ते, अगदी योग्य असून ही संकल्पना अंमलात आणली जाईल.
‘रायगड विकास प्राधिकरणाला, गोवा सरकार ने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष राहिला होता. व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल. असे संभाजीराजेंनी सांगितले.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आमच्याकडे पोर्तुगीज आणि मराठी किंवा इंग्रजी जाणणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला अम्ही सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊ. महाराज, आम्ही सुद्धा गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील किल्य्यांचे संवर्धन करत आहोत. अनेक ठिकाणी स्मारके उभी करण्यास सुरुवात केली आहे. किल्ले संवर्धन आणि जतन यामध्ये आपलेही योगदान मोठे आहे. आपल्या अनुभवाचा लाभ गोवा सरकार ला सुद्धा झाला तर आम्ही आनंदी असू.
खासदर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री महोदयांना आश्वासन दिले, की आपण मिळुन काम करू. मी आपल्याला सर्व ते सहकार्य करिन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments