शाळा निर्जंतुकीकरण करणारा ध्येयवेडा शिक्षक द्वारकानाथ भोसले : राज्यप्रमुख सुधाकर सावंत
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा निर्जंतुकीकरण करणारा ध्येयवेडा शिक्षक द्वारकानाथ भोसले यांचे महानगरपालिका शाळांना खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी केले.राज्यपाध्यक्ष उमेश देसाई यांनी द्वारकानाथ भोसले यांनी दानशूर व्यक्ती, देणगी सामाजिक संस्था यांच्या मदतीतून लाखो रुपये उभे केले व शहरातील विविध शाळांना त्यांनी शैक्षणिक साहित्य दिले त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर शहर च्या वतीने द्वारकानाथ भोसले यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक साहित्य पीपीई कीट, N 95 मास्क,सैनिटाइजर कॅन शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई शिक्षक समिती कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य उत्तम गुरव खाजगी शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक शहाजी घोरपडे रामदास वास्कर वहिदा मोमीन,बाबूराव माळी, अनिल साळोखे,विष्णू देसाई आदि सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संजय पाटील यांनी केले तर आभार जयश्री आवळे यांनी मानले. मा.द्वारकानाथ भोसले सर यांनी स्वखर्चाने स्वतः पी.पी.ई. कीट परिधान करुन शाळेचे निर्जंतुकीकरण करतात कोरोनाच्या क पार्श्वभूमिवर हे निर्जंतुकीकरण अत्यावश्यक होते. भोसले सर मनपा शाळांना नेहमीच मदत करतात.अनेक शाळांना साऊंड सिस्टीम ,मुलांना वाॕटर बाॕटल्स,टिफीन बाॕक्स,शिक्षकांना डाय-या,ज्ञानरचनावादी वर्गांसाठी मदत,मार्गदर्शन,भौतिक सुविधांसाठी आर्थिक मदत इ. असे अनेक प्रकारची मदत ते शाळांना करतात. कामाचा वसा घेतलेल्या मा. भोसले सरांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड होवून त्यांना सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२० हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झालेबद्दल शिक्षक समितीच्यावतीने त्यांचे त्रिवार अभिनंदन