खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौऱ्याची केली गेली जोरदार तयारी
कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याची स्थानिक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.जिल्ह्याच्या प्रशासनासह पोलीस प्रशासन ही सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापूरचे जावई असणाऱ्या शहा यांच्या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नियोजन करून सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी मायक्रो प्लॅनिंग सुरू केल्याने भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शिवजयंती दिनी रविवारी केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या आठ तासाच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.दरम्यान भाजपमध्ये पक्ष पातळीवर आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासह त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी आणि त्यांच्यावर राजकीय मायलेज मिळविण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दौऱ्याचे पक्षीय स्तरावर नियोजन केले गेले असून या सर्व नियोजनाची सूत्रे खासदार धनंजय महाडिक यांनी सांभाळली आहेत. माजी आमदार जिल्हाध्यक्ष इतर सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी मायक्रो प्लॅनिंग करून अमित शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.