Friday, September 13, 2024
Home ताज्या पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ

पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भैय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, योगेश जाधव, हिंदुराव शेळके, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, समरजीतसिंह घाटगे, विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी ‘पंचमहाभूत संरक्षणाची शपथ’ उपस्थितांना दिली.
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या २० मिनिटांमध्ये ५० कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले अपायकारक परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश ‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगातून देण्यात आला.स्क्रीन, लेझर शो, नृत्य, नाट्य व स्पेशल इफेक्ट (अग्नी, वारा, पाऊस) चा वापर करुन तयार करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच संदेशपर प्रयोग असल्याची माहिती निर्माते -दिग्दर्शक विजू माने यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments