महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिराचा ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी प्रयोग
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिरातील शिक्षकांनी विध्यार्थ्याबरोबर गुगल मीट, वेबेक्स सारख्या माध्यमातून संवाद साधून ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘शाळा बंद शिक्षण सुरु ही मोहिम कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीने यशस्वीपणे राबविली. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिरात ऑनलाईन शिक्षणावर भर देऊन शिक्षणाचा पाया घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महापालिकेच्या पहिली ते सातवीचे अध्यापन करणारे शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणात सक्रीय पुढाकार घेतला. शासनाने तयार केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेच्या आधारे अभ्यासाचे महिनानिहाय नियोजन करुन विध्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन नियोजनानुसार अभ्यासक्रम पूर्ण केला. विध्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाला उपस्थिती वाढावी यासाठी आनलाईन चित्रकला, भाषण, निबंध, हस्तकला इत्यादी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शिक्षकांनी तयार केलेल्या विविध व्हिडीओचा प्रभावी वापर करुन अध्यापन झालेल्या घटकावर आनलाईन टेस्टही घेतली जाते. यासाठी विविध ॲप, पीडीफ यांचा उपयोग केला जातो. शाळेचे मुख्याध्यापक सुनील गणबावले हे दर आठवड्यालाआनलाईनअध्यापना संदर्भात अढावा घेऊन मार्गदर्शन करतात. शाळेतील सर्व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत असून सुद्धा विध्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षक प्रयत्न करत आहेत.
नूतन महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रथमिक शिक्षण प्रशासनाधिकारी एस.के. यादव आणि शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांच्या प्रेरणेतून ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम अखंडपणे सुरु राहावा यासाठी मुख्याध्यापक सुनील गणबावले, शिक्षक संजयकुमार देसाई, सुनील रावते, निलेश पोवार, सदाशिव पोवार, सौ वैशाली पाटील, सौ निर्मला ठाणगे, सौ सुजाता पोवार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. करत आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिक्षकाबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे.