सिद्धगिरी मठ परिवाराचा सत्कार हा नैतिक बळ वाढवणारा – तानाजी सावंत
कोल्हापूर/प्रतिनिधी : पोलिस प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना केलेल्या कामाची दखल घेत आणि मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल मोठी अध्यात्मिक आणि कृतिशील समाजभूमी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी परिवाराकडून होत असलेला सत्कार हा आपले नैतिक बळ वाढवणारा आहे आणि यामुळेच आपण भविष्यातील अधिकाधिक चांगली कामगिरी करू ‘ असा विश्वास पोलीस अधिकारी तानाजी सावंत यांनी व्यक्त केला .सिद्धगिरी कणेरी मठ येथे पूजनीय काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचे नोडल ऑफिसर तानाजी सावंत यांना मिळालेल्या विविध शासकीय पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार सिद्धगिरी मठाचे पूजनीय काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला .प्रारंभी सर्वांचे स्वागत डॉक्टर संदीप पाटील यांनी करत तानाजी सावंत यांच्या विविध पैलू च्या कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा घेतला. यावेळी सेंद्रिय शेती प्रयोगशील उत्पादक पी डी सावंत यांच्यासह शंकर पाटील, माणिक पाटील चुयेकर, डॉ. संदीप पाटील, राजेश डाके, यशोधन बारामतीकर दीपिका पाटील यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .