गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गोरगरिबांना दिलासा देणारे केंद्र ठरेल-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय गोरगरिबांना दिलासा देणारे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या समस्या सुटाव्यात, हीच आपली भावना असल्याचे ते म्हणाले. गडहिग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे स्थलांतर दसऱ्यानिमित्त नूतन इमारतीत झाले. या कार्यालयाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहरात स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यापासून पक्षाचे कार्यालय सुरू होते. परंतु; ती जागा अपुरी पडू लागल्यामुळे या नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतरित केले.
यावेळी उदयराव जोशी, जिल्हापरिषद उपाध्यक्ष सतिश पाटिल, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, नगरसेवक हरुण सय्यद, कार्याध्यक्ष डाॕ. किरण खोराटे, माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, नवाब मालदार, अरविंद बारदेस्कर, दास सर, अशपाक मकानदार, प्रशात शिंदे,नगरसेवक शुभदा पाटील, सौ रेश्मा कांबळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष उज्वला कुंभार, सुनिता नाईक, शारदा आजरी, सुनिल चौगुले, युवक शहर अध्यक्ष गुंडू पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे,अर्बन बँक अध्यक्ष बाळासाहेब घुगरी,अल्फसंख्याक शहर अध्यक्ष राजू जमादार, उदय परीट, मुरली कांबळे, राहूल शिरकोळे, तुषार यमगेकर, शिवराज पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते