कोरगावकर पेट्रोल पंपावर ग्राहकांना बंपर लकी ड्रॉ चे बक्षीस वितरण
शिरोली (पुलाची)/प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे यंदाही दीपावली व नूतन वर्ष बंपर लकी ड्रॉचा बक्षीस वितरण सोहळा येथील मे. कोरगावकर अँड सन्स पेट्रोल पंप येथे संपन्न झाला.नियोजित कालावधीत ज्या ग्राहकांनी येथील पंपावर इंधन घेतले व आपल्या नावाचे कुपन बॉक्समध्ये टाकले, त्यातील पन्नास भाग्यवान ग्राहकांचे कुपन लहान मुलांना बोलावून काढण्यात आले. त्या भाग्यवान विजेत्या ग्राहकांना ग्राहक उपयोगी वस्तूंचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले.
यावेळी पंपाचे मालक अमोल कोरगावकर व राज कोरगावकर उपस्थित होते. आशिष कोरगावकर व अनिकेत कोरगावकर व कर्मचारी यांचे यासाठी सहकार्य लाभले.