प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हयासाठी ८९ कोटी ३४ लाख रूपये मंजूर खासदार – धनंजय महाडिक
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती कनेक्टीव्हिटी, साखर निर्यात, रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक विषयांना खासदार महाडिक यांनी चालना दिली आहे. आता जिल्हयाच्या अंतर्गत भागातील रस्ते चकाचक करण्यासाठी खासदार महाडिक यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २८ रस्त्यांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यातून २८ पैकी २४ रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार १२०.२४ किलोमीटर लांबीचे रस्ते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बनले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रूपये मंजूर झाले आहेत.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत, आजरा तालुक्यात साडेदहा किलोमीटर रस्त्यांसाठी ७ कोटी २२ लाख ९९ हजार रूपये, भुदरगड तालुक्यातील २१.३७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी १६ कोटी ४ लाख ७८ हजार रूपये, चंदगड तालुक्यातील २१.१८० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८ कोटी ८८ लाख ७४ हजार रूपये, गगनबावडा तालुक्यातील ६.८९० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी ४ कोटी ७१ लाख २६ हजार रूपये, हातकणंगले तालुक्यातील १६.१०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी १० कोटी ११ लाख ६८ हजार रूपये, करवीर तालुक्यातील १२.०९० किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी १७ लाख ८९ हजार रूपये, पन्हाळा तालुक्यातील ६.८२० किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ९४ लाख ५३ हजार रूपये, राधानगरी तालुक्यातील १३.०२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७ कोटी २७ लाख ४२ हजार रूपये, शाहूवाडी तालुक्यातील ३.०३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ४३ लाख ३१ हजार रूपये आणि शिरोळ तालुक्यातील ९.१९० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७ कोटी ५१ लाख ६९ हजार रूपये असे जिल्हयातील एकूण १२०.२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी, ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार झाल्यापासून जिल्हयातील विमानसेवा, रेल्वे आणि रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक सातत्याने प्रयत्नशिल आहेत. एकूणच जिल्हयाच्या विकासासाठी खासदार महाडिक नवनवीन प्रकल्प आणत आहेत. त्यामुळे जिल्हयात विकासाच्या नवनवीन वाटा खुल्या होत आहेत.