Tuesday, December 10, 2024
Home ताज्या खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा - आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या...

खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या जिल्हा प्रशासनाला बैठकित सूचना

खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या जिल्हा प्रशासनाला बैठकित सूचना

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील खडकेवाडा व बेळुंकी येथील गावठाणातील भूखंड धारकांची प्रलंबित मालकी हक्काची मागणी नियमित करा, अशा सूचना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात झालेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ अशा संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
याबाबत अधिक माहिती अशी, गावातील घरे नसलेल्या २५ जणांना गावठाणातील भूखंडांची ताबापट्टी मिळून, त्यावरती ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. परंतु; त्यांना अद्यापही मालकीपत्रे मिळालेली नाहीत. हा प्रश्न तातडीने निकालात काढण्याच्या सूचना आमदार श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.
तसेच, दुसऱ्या टप्प्यातील ३२ भूखंडापैकी १४ ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. त्यांनाही अद्याप कब्जेपट्टी मिळालेली नाही. आठ भूखंडधारकांनी शर्तभंग केलेली आहे. तसेच, दहा भूखंड मोकळे आहेत. या सर्वांना सनदशीर मार्गाने वहिवाटीनुसार त्यांची मालकी हक्कपत्रे देण्याच्या सूचना आमदार श्री. मुश्रीफ यांनी केल्या.
या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे, कागलच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, सरपंच भाऊसाहेब पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील, हरी कुंभार, प्रल्हाद पाटील, युवराज जाधव, सतीश कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments