सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरण आणि गोहत्या विरोधी ‘विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा
विराट मोर्चात सहभागी झाल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध संस्था संघटना आणि तमाम माता-भगिनींचे जाहीर आभार
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रूबिका पहाडन या हिंदू तरुणीचे ५० तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये तसेच दुसरीकडे देशात छळ-बळ-प्रलोभन दाखवून हिंदूंचे वाढते धर्मांतरण नव्या राष्ट्रांतराला जन्म देऊ शकते. हे राष्ट्रघातकी ‘धर्मांतरण’ आणि ‘लव्ह जिहाद’ तसेच गोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लव्ह जिहाद विरोधातकायदा लवकर व्हावा तसेच गडकिल्ल्यावरील अतिक्रमणे सत्वर दूर करावी त यासह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापुरात काढण्यात आलेल्या भव्य मोर्चामध्ये सहभागी झालेले विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध संघटना संघटना तसेच तमाम हिंदू माता भगिनी आणि नागरिक यांचे जाहीर आभार संयोजक समन्वयक सकल हिंदू समाज यांच्यावतीने मानण्यात आले.
या मोर्चासाठी महाद्वार व्यापारी संघटना तसेच कोल्हापूर सराफ असोसिएशन यांच्यासह विविध संस्था संघटनांनी मोर्चाच्या मार्गावर उत्स्फूर्तपणे पाण्यापासून अल्पोपहार पर्यंतची व्यवस्था केली होती तसेच या मोर्चामध्ये आपला उत्स्फूर्त असा सहभाग व्यापारी बंधूंनी आपले व्यवहार बंद ठेवून नोंदवला होता. त्याबद्दलही समाजावतीने आभार मानण्यात आले आहेत. मोर्चाचे समन्वयक किशोर घाडगे संभाजी साळुंखे पराग फडणवीस, अँड. सुधीर जोशी, वंदुरकर, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, गजानन तोडकर, चंद्रकांत बराले, महेश जाधव,राहुल चिकोडे, उदय भोसले, अवधूत फाटे, राजीव यादव, शरद माळी, आशिष लोखंडे आदींसह या मोर्चासाठी कष्ट केलेल्या सर्वांनी सकल हिंदूंच्या वतीने सहभागी सर्वांचे आभार मानले आहेत.
आगामी काळात या मागण्या मान्य न झाल्यास हिंदू समाज आक्रमकपणे अशा संघटित स्वरूपात रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही सकल हिंदू समाज यांच्या वतीने देण्यात आलेला आहे .
उपस्थित संघटना, पक्ष आणि मान्यवर – भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक, राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, श्री. महेश जाधव, श्री. अशोक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख (शिंदे गट) श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, श्री. विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे शहरप्रमुख श्री. रवीकरण इंगवले, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. हर्षल सुर्वे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री. सचिन तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, श्री. आशिष लोखंडे, सुरेश यादव ‘वंदे मातरम् युथ फाऊंडेशन’चे श्री. अवधूत भाट्ये, सौ. श्वेता कुलकर्णी, सौ. सुप्रिया दळवी, किशोरी स्वामी यांसह संघटना बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन यांसह यांचे अनेक पक्ष, संघटना यांचे मान्यवर उपस्थित होते.