Tuesday, July 23, 2024
Home ताज्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा "सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची अलोट...

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची अलोट गर्दी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची अलोट गर्दी

२ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, इतर खोंड, भोला व बापू नावाचा रेडा, जाफराबादी गाय,हँगस्टर जातीचे उंदीर, व ६५ व ५० किलो वजनाचा माडग्याळ मेंढा प्रदर्शनाचे खास आकर्षण

८६५३२,१८१२१ ऊसाचे देशी वाण व विदेशी भाजीपालाही ठरत आहे खास आकर्षण

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी झाली एकूण अडीच कोटीच्या आसपास उलाढाल

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२२ प्रदर्शनास शेतकऱ्यांची आज दुसऱ्या दिवशी तपोवन मैदानावर अलोट गर्दी ही झाली आहे. यावर्षीचे प्रदर्शनाचे चौथे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,लम्पि आजार असल्याने एकूण ५३ जनावरे, अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला,फुले,शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे.प्रदर्शनात एकूण अडीच कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.
२ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, इतर खोंड, भोला व बापू नावाचा रेडा, जाफराबादी गाय,हँगस्टर जातीचे उंदीर, व ६५ व ५० किलो वजनाचा माडग्याळ मेंढा प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.तर ८६५३२,१८१२१ ऊसाचे देशी वाण व विदेशी भाजीपालाही खास आकर्षण ठरत आहे.शिवाय ऊस पिकावर ड्रोन द्वारे फवारणी हेही आकर्षण ठरत आहे.हा ड्रोन पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.

विविध कंपन्या व उत्पादनांचा सहभाग

या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या असून यामध्ये गोकुळ दूध संघ व त्यांची उत्पादने,ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिद्धीक ऑईल, मयुरेश इंडस्ट्रीज, मिल्क फूड इंजिनियर्स,भारत अँग्रो, धनलक्ष्मी आटा चक्की, एस टी सी स्वरूप आटाचक्की,सिल्व्हर पंम्पस अँड मोटर्स यांची विविध उत्पादने,समृद्धी सोलर आणि मालपाणी ग्रुप, फिनोलेक्स श्री एंटरप्राईजेस, संकेत बायो, रोहन हायटेक ॲग्री, कृष्णा ट्रेडर्स, नवजीवन ॲग्रो,मॅजो महावीर पॉवर टिलर, बेनेली बाईक, युनिक ह्युंडाई, कदम बजाज, चातक इनोव्हेशन, चेतन मोटर्स, यांच्या विविध गाड्या,पॉवर सोल्युशन, कृषी चॅग हार्वेस्टरस,रॉयल इन्फिल्ड, पॉवर ट्रेलर्स, ट्रॅक्टर रेनबो कंटेनर्स, बी-बियाणे शेतीची अवजारे, व खते औषधे आदी उत्पादने पाहावयास मिळत असून पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत व खरेदीही करत आहेत.

प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद,विविध फळे पेरू विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.प्रशासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागा अंतर्गत या ठिकाणी शेततळे उभा करण्यात आले आहे. याचबरोबर प्रदर्शनामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने तुती बने रेशीम आळी,त्यापासून रेशीम निर्मिती व कापड यांची प्रात्यक्षिके मांडण्यात आले आहे.

प्रदर्शनात अशी आहेत जनावरे

या प्रदर्शनामध्ये २ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, शाहू घोडा जो सतेज कृषी प्रदर्शनात मानकरी ठरला आहे.याशिवाय १० घोडे जे पांढऱ्या रंगाचे आहेत.तेही आकर्षण ठरत आहेत.तानाजी पाटील पन्हाळा यांचा बैल, बजरंग परीट यांचा बैल, युवराज महाडिक यांचा खोंड आणि बैल, संजय पाटील यांचा खोंड, महेश पाटील यांचा खोंड सुराप्पा म्हाकोजी तांबळ रा. वाशी यांची मरगाई जातीची शेळी जी ७० किलो वजनाची आहे.व मेंढा ५० व ७० किलो वजनाचा मेंढा आकर्षण ठरत आहेत. इतर खोंड, भोला व बापू नावाचा रेडा, जाफराबादी गाय,हँगस्टर जातीचे उंदीर, बदक कडकनाथ कोंबडी व चिनी कोंबडी गीज व इंडियन नर व्हाइट बँकिंग पक्षी, प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

भाजीपाला व फुलांचा समावेश

भाज्यांमध्ये सिमला मिरची,मुळा, हळद, चेरी टोमॅटो, दोडका, फ्लॉवर लाल मिरची आदींसह विदेशी भाजीपालामध्ये लाल बायोण्डा, बेसी,गोकुली, चेरी टोमॅटो,रेड कॅबीज,चायनीज कॅबीज आदी भाजीपाला समाविष्ट आहे तर फुलांमध्ये जरबेरा,रॉयज अँड शाईन,निशिंगध अशा फुलांचा समावेश आहे.

याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे.
तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि हायड्रोलिक चारा तयार करणे याचीही माहिती दिली जात आहे.

आज झालेली व्याख्याने

आज २४ डिसेंबर रोजी सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन या विषयावर बोलताना कृषी विद्या विभाग नेटाफिन इरिगेशन पुणेचे प्रमुख श्री. अरुण देशमुख यांनी शेतीच्या पद्धती, त्यातील बारकावे, ऊसाच्या बियाणांची निवड कशी करावी व लागण कशी करावी,शेतीची स्थिती,ठिबक सिंचनाद्वारे खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.तर सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन या विषयावर शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री सुरेश कबाडे यांनी पीकांची फेरपालट,जमिनीचा बेवड, पाचट न जाळता त्याचा योग्य वापर कसा करावा,माती परीक्षण,हिरवळीच्या खतांचा वापर याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.शिवाय ऊसाचे बियाणे ऑगस्ट महिन्यात वाळत घालून ते जून महिन्यात शेतात पेरावे असेही सांगितले.यानंतर मार्गदर्शकांनी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

आज होणारी व्याख्यान

रविवार दि. २५/१२/२०२२
स. ११ ते दु. १२.३० जनावरांचे रोग व्यवस्थापन डॉ. सॅम लुद्रिक
पशुधन विकास अधिकारी रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर
रविवार दि. २५/१२/२०२२
दुपारी १२.३० ते २ दुग्ध व्यवसाय कुटुंबाचा आर्थिक आधार श्री. अरविंद पाटील
प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी मु.पो. नाणीबाई चिखली कोल्हापूर यांचे व्याख्यान होणार आहे.

देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व या प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.
सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनात पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अजून दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व संयोजकांनी केले आहे.

सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल : सेंद्रीय गूळ : १००० किलो ग्रॅम,इंद्रायणी तांदूळ : ८०० किलो ग्रॅम,
आजरा घनसाळ : १००० किलो ग्रॅम
सेंद्रीय हळद : ५०० किलो ग्रॅम
जोंधळा जिरगा तांदूळ : २०० किलो ग्रॅम
नाचणी : ३०० किलो ग्रॅम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments