Friday, December 13, 2024
Home ताज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावांना साजेस सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावांना साजेस सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करू – पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावांना साजेस सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करू – पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर

आगामी सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने “प्रभाग तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या सूत्रांने काम करण्यास सज्ज व्हा: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पक्षबांधणीसाठी पदाधिकारी मेळावा

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. प्रंसगी गुन्हे अंगावर घेवून आयुष्यभर कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला विरोध केला पण, तीच शिवसेना कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या विचारांवर चालू लागली आणि कडवट शिवसैनिकांना पदोपदी होणारा अवमान सहन न झाल्यानेच शिवसेनेत उठाव झाला. या उठावाचे सूत्रधार मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंनद दिघे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत असून, टीकेला उत्तर न देता महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून शिवसेना काम करत आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्याची उन्नती आणि सर्वांगीण विकास हेच धोरण शिवसेनेचं असून, त्यास मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे समस्त शिवसैनिकांच्या साथीने समर्थ आहोत. सत्तातंर झाल्यानंतर मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचे कार्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावे. शिवसेना आणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे अतूट नात असून, या दोन्ही नावांना साजेस सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करुया, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांनी केले. कोल्हापुरातील राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पक्षबांधणी मेळावा आज पार पडला. याप्रसंगी त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याच्या सुरवातीस युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते नवनियुक्त वेतवडे गावच्या सरपंच सौ.रेखा अनिल पोवार, वसगडे गावच्या सरपंच सौ.योगिता तेजस बागडी आणि शिवसेनेच्या नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यानंतर शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री.अंकुश निपाणीकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांनी, शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी सुरु केली. मराठी मनातील स्वाभिमान शिवसेनेच्या माध्यमातून जागा केला. शिवसेनाप्रमुखांनी कधीच आपला स्वाभिमान कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला नाही. शिवसेनेत हिंदुत्वाची विचारसरणी बाळासाहेबांनी रुजविली. या व्यापक हिंदुत्वाच्या विचारसरणी पासून बाजूला जावून कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी घरोबा करणे, अनेकांना खटकले त्यातून मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव शिवसेनेतील क्रांती ठरला. हा उठाव झाला नसता तर शिवसेना नावाला शिल्लक राहिली नसती. राष्ट्रवादीच्या नादाला लागून एकीकडे पाच नंबरला गेलेले आणि बाळासाहेबांचे विचार घेवून आम्ही पुढे नेत असलेली शिवसेना यातील फरक जनतेने ओळखला आहे. महाराष्ट्राचा अभिमान जागृत ठेवून सीमाप्रश्न, रोजगार निर्मिती असे अनेक प्रश्न आगामी काळात सोडवू आणि कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेस गतवैभव प्राप्त करून देवू, असेही प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेनेस इतिहास आहे. ६ मे १९८६ च्या शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून रात्रंदिवस काम करून शिवसेना वाढविली. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीतून जनतेला न्याय देणाचे काम केले. शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती कि कॉंग्रेस – राष्ट्रवादी शी कदापि युती नाही परंतु कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी युतीची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतल्याने अनेक कडवट शिवसैनिकांमध्ये घुसमट होती. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची शिवसेनेची वाताहत होत असताना मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परिवर्तनाची लाट आणली आणि राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि कडवट शिवसैनिकांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा दिला. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात सुरु असलेली परिवर्तनाची आणि विकासाची लाट हेच कर्तुत्व शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत होते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना दोन नंबरला आहे. शिवसेना ही आपलीच आहे. पुढील काळात चिन्हाचा निकालही आपल्या बाजूने लागणार आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री शिवसेनेचे असणे हे दुग्धशर्करा योग असून, कोल्हापूर जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देता यावा यासाठी पक्ष संघटना मजबूत असणे गरजेचे आहे. “गाव तिथे शाखा… घर तिथे शिवसैनिक” हे सूत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले असून, या सूत्रानुसार मार्गक्रमण करून गाव व प्रभाग तिथे शाखा.. घर तिथे शिवसैनिक.. कॉलेज तिथे युवासैनिक यामाध्यमातून काम करावे. सर्वाना न्याय देण्याचे काम आपल्याला करून दाखवायचे आहे. सीमा वासियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. येत्या २६ तारखेला कोल्हापुरात येणाऱ्या सीमावासीयांच्या सोबत शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने उभे रहावे. सत्तेतून प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देण्याचे धोरण ठरविले असून, जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका ताकतीने लढवून जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने कामाला लागावे, अशा सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
या मेळाव्यास रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, जयवंत हारूगले, महेंद्र घाटगे, सुनील जाधव, बिंदू मोरे, पुजाताई भोर, पवित्रा रांगणेकर, संजय संकपाळ, राजू हुंबे, पियुष चव्हाण, योगेश चौगले, रमेश पोवार, अश्विन शेळके, मंदार पाटील, यांच्यासह शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments