Friday, September 20, 2024
Home ताज्या स्वच्छता मोहिमेत आपट्याची झाडे लावून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश, आयुक्तांनी केली...

स्वच्छता मोहिमेत आपट्याची झाडे लावून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश, आयुक्तांनी केली यल्लमा मंदिर परिसरात स्वच्छता

स्वच्छता मोहिमेत आपट्याची झाडे लावून
दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश,
आयुक्तांनी केली यल्लमा मंदिर परिसरात स्वच्छता

कोल्हापूर /प्रतिनिधी : चला हिरवं सोनं वाचवूया : सर्वांनी सोन्यासारखं राहूया ! हा पर्यावरण रक्षणाचा आणि हिवरायीचा संदेश देत आजच्या 78 व्या स्वच्छता मोहिमेत यल्लमा मंदिर परिसर तसेच जयंतीनाला परिसरात आपटा आणि कांचन वृक्षाची झाडे लावून विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या महास्वच्छता अभियानात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणावर खऱ्या अर्थाने भर देण्यात आला. आज स्वरा फौंडेशन आणि वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनच्यावतीने विजयादशमी दसऱ्यानिमित्ताने जुन्या रूढी परंपरांना फाटा देत नव्या पर्यावरण पूरक विचारांना उभारी देण्यासाठी तसेच चुकीच्या व घातक प्रवृत्तीचे सीमोल्लंघन करण्यासाठी झाडांची पाने न तोडता यल्लमा मंदिर परिसर,जयंतीनाला तसेच शहर ट्राफिक ऑफिस ते खानविलकर पेट्रोल पंप रोडवर आपटा आणि कांचन वृक्षाची प्रत्यक्षात झाडे लावून पर्यावरणपूरक विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला.
यावेळी स्वरा फौंडेशनमार्फत यल्लमा मंदिर परिसर तसेच जयंतीनाला परिसरात ४० आपट्याची झाडे लावण्यात आली. तसेच वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत शहर ट्राफिक ऑफिस ते खानविलकर पेट्रोल पंप रोडवर आपटा, कांचन वृक्ष लावण्यात आले.
आजच्या ७८ व्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यलम्मा मंदिर परिसर तसेच जयंती नाला परिसरात हातात झाडू घेऊन प्रत्यक्षपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. आजच्या स्वच्छता मोहिमेत यलाम्मामंदिर परिसर, जयंती नाला, दसरा चौक, अंबाई टँक परिसर, महावीर कॉलेज ते पोलीस अधिक्षक कार्यालय रोड, तसेच कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवरील कचरा व प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच झाडे, झुडपे आणि कचरा काढून परिसर स्वच्छ आणि नेटका बनविला. यामुळे स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या कामासही गती मिळाली.
कोल्हापूर महानगरपालिका आणि विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत २ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. आजच्या स्वच्छता मोहिमेत २ पाण्याचे टँकर, १ औषध फवारणी टँकर, ३ आर.सी.गार्ड, ६ डंपरचा वापर करण्यात आला. तसेच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने तसेच शहरातील विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने मोहिम राबविण्यात आली.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यलम्मा मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन या मोहिमेला बळ दिलं. तसेच या परिसरातील नागरिकांना कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रणासाठीच्या प्रतिबंधक उपायोजनांची माहिती दिली. कोरोना कमी झाला असला तरी धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरण्याबरोबरच सामाजिक अंतर पाळावे, साबनाने वारंवार हात धुवावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, गर्दी टाळावी तसेच कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ. बलकवडे यांनी केले.
महानगरपालिका तसेच स्वरा फौंडेशनच्यावतीने यल्लमा मंदिर येथे बी वार्ड कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या स्वछता अभियानात आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह नगरसेविका सौ. अश्विनी बारामते, आरोग्यधिकारी डॉ अशोक पोळ, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, स्वच्छता दूत अमित देशपांडे तसेच महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोलकर, सुशांत कवडे, श्रीराज होळकर, स्वरा फौंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, सन्मेश कांबळे, धर्मराज पाडळकर, आदित्य पाटील, मानसी कांबळे, फैजान देसाई, सुफीयन शेख आदिजण उपस्थित होते.
वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत आज शहर ट्राफिक ऑफिस ते खानविलकर पेट्रोल पंप रोडवर आपटा, कांचन वृक्ष लावण्यात आली. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढ़े, सतीश कोरडे, रोहन बेवीनकट्टी, विजय जाधव, सौ सविता साळुंखे, साजिद शेख, अनुज वागरे, प्रसाद भोपळे, परितोष उरकुडे, अक्षय कांबळे, शैलेश टिकार, तात्या गोवावाला,सागर कुरबेट्टी, उदयसिंह जाधव, प्रवीण मगदूम आदिंनी सहभाग घेतला. यावेळी जयंती पपिंग स्टेशन येथे जयंती उद्यान सकारण्याच्या दृष्टीने वाढलेले गवत, तण काढून स्वछता करण्यात आली, नंतर जयंती नदीच्या काठावर महापालिकेच्या ड्रेनेज व पाणीपुरवठा अभियंत्यांच्या हस्ते आपटा झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले.आजच्या मोहिमेत महापालिकेचे सर्वच आरोग्य निरिक्षक,कर्मचारी तसेच विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्‍थांचे पदाधिकारी आणि नागरिकही सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments