Friday, September 20, 2024
Home ताज्या कवठे महांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

कवठे महांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

कवठे महांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळच्‍या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन माऊली दूध शितकरण केंद्र कदमवाडी, ता.कवठे महांकाळ, जि. सांगली येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या शुभ हस्ते तसेच युवा नेते रोहित आर पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व इतर प्रमुख मान्‍यवराच्‍या उपस्थितीत झाले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्‍यक्ष युवा नेते रोहीत आर.पाटील म्‍हणाले कि दुग्ध व्यवसायाला चालणा देण्याचे काम गोकुळने केले असून कवठे महांकाळ सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम गोकुळ दूध संघ निश्चितच करेल असा विश्वास व्यक्त केला.भविष्‍यात उत्‍तम गुणवत्‍तेचे दूध संकलन करण्यासाठी गोकुळ दूध संघास सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि शेती बरोबर दुग्‍ध व्‍यवसाय हा टि‍कला तरच शेतकरी आर्थिक सधन होऊ शकतो. या साठी दुग्ध व्यवसायातील आधुनिकतेचा स्वीकार करत पारंपारिक दुग्ध व्यवसाय न करता तो आधुनिक पद्धतीने व किफायतशीरपणे करणे ही काळाची गरज आहे व पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले कि या परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळच्या माध्‍यमातून चालना मिळणार आहे. या भागात दूध संकलन वाढीसाठी गोकुळ च्या विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा व दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे. या तालुक्‍यात वेगवेगळ्या भागात भविष्यात क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरस युनिट सुरू करून उत्‍तम गुणवत्‍तेचे दूध संकलन करण्याचा  गोकुळचा  मानस आहे. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली.
याप्रसंगी स्वागत व प्रस्ताविक माऊली दूध उत्‍पा.व पुरवठा सह.संस्‍थेचे संस्थापक पोपटराव कदम यांनी केले. तर आभार सुभाष खांडेकर यांनी मानले तर सूत्रसंचलन शहाजी कदम यांनी केले.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील (आबाजी),रोहित आर पाटील, विकास हाक्‍के, विकास कदम, चंद्रकांत हाक्‍के,गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,गणपत चव्‍हाण,शामराव घाटगे,गणेश कदम, सोपानराव जगदाळे, सुभाष खांडेकर, संतोष देसाई, दिलीप झुरे,संजय घागरे,सतिश कदम,संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर,एस.आर.पाटील, भानुदास पाटील,आ.एन.पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments