भादवणला सर्वांगसुंदर विकासातून जिल्ह्यात एक नंबर बनवू – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन
भादवणमध्ये समविचार परिवर्तन आघाडीचा विजय निश्चित
प्रचार सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुणाच्याही धमक्यांना भीक न घालता निर्भयपणे मतदान करण्याचे केले आवाहन
भादवण/प्रतिनिधी : भादवण हे आजरा तालुक्यातील एक प्रमुख गाव आहे. या गावात गेल्या अडीच वर्षात सहा कोटीहून अधिक निधीची विकासकामे झाली आहेत. विकासकामांच्या माध्यमातून या गावाला सर्वांग सुंदर बनवून जिल्ह्यात एक नंबर आणू, अशी ग्वाही आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिली. कुणाच्याही धमक्यांना भीक न घालता समविचारी परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना निर्भयपणे मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.
भादवण ता. आजारा येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समविचारी परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जलजीवन पाणीपुरवठा योजनेसह श्री. महादेव मंदिर परिसर सुशोभिकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गावांतर्गत व गावाला जोडणारे रस्ते, पानंदरस्ते या स्वरूपात सहा कोटीहून अधिक निधीचा विकास गेल्या अडीच वर्षात झाला आहे. उर्वरित विकासकामेही आमदार निधी व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पूर्ण करून देऊ.
माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, आजरा तालुक्यातील उत्तुर जिल्हा परिषद परिषदेचा हा भाग गेल्या बारा वर्षांपूर्वी कागल विधानसभा मतदारसंघाला जोडला. त्यानंतरच हा भाग विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यानी कागल तालुक्याबरोबरच या भागाचा नियोजनबद्ध सर्वांगीण विकास केला आहे.
यावेळी डॉ. गोपाळ केसरकर, आनंदराव जोशीलकर, भिवा जाधव, विष्णू मुळीक, सुतार गुरुजी, संजय मुळीक, बाळासाहेब डोंगरे, संजय गाडे, विजय माने, हरिश देवरकर, शैलेश मुळीक, संजय केसरकर, बाबुराव पाटील, सुनील जोशीलकर, शंकर कांबळे, जयसिंग पाटील, संजय मुळीक, विष्णू खुळे, धोंडीराम भादवणकर, अनंत डोंगरे, शंकर कांबळे, रामजी देसाई, मधुकर आसबे आदी प्रमुखांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत आनंदराव जोशीलकर यांनी केले. प्रास्ताविक हरीश देवरकर यांनी केले.