Tuesday, October 15, 2024
Home ताज्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी रस्ता...

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न संपला

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न संपला

मुरगुड/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी या वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मिटला आहे. वन विभागाने हा रस्ता खडीकरणासह, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे यांच्याकडे दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, कागल तालुक्यासह गडहिग्लज, भुदरगड व आजरा या तालुक्यातील वाहतुकीच्यादृष्टीने हसूर बुद्रुक, बोळावी, ठाणेवाडी, अवचितवाडी, चिमगाव  ते मुरगूडपर्यंत हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे पाटीपासून सुरू झालेला हा रोड पुढे मुरगूडला संपतो. दरम्यान; हसूर बुद्रुक ते बोळावी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांपैकी साधारणता एक किलोमिटर लांबीचा रस्ता वनविभागाच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या कायद्यामुळे हा रस्ता करता येत नव्हता. प्रत्यक्षात रस्ता असतानाही त्यावर खडीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी कायद्याने बंदी होती.
खडी उखडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे अनेक अपघात होत होते. अनेक वेळा ग्रामस्थ आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष सुद्धा झाले आहेत. वनविभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेशिवाय हा रस्ता करता येत नव्हता.

चौकट,
अनेक वर्षापासूनचा प्रश्न संपला याबाबत बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाने रस्ता करण्यासाठी मंजुरी द्यावी, म्हणून मी प्रयत्न करीत होतो. वन विभागाचे मुख्य कार्यालय असलेले भोपाळ, नागपूर आणि मुंबई असा दीर्घकालीन प्रवास करून आत्ता ही मान्यता मिळालेली आहे. हा रस्ता शॉर्टकट असल्यामुळे लोक या मार्गानेच जाणे पसंत करतात. आत्ता पाऊसही संपत आलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरणासह डांबरीकरण सुरू करून हा रस्ता सुसज्ज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या भागातील लोकांचा गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न सुटलेला आहे, याचा मला मनापासून आनंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments