Thursday, October 24, 2024
Home ताज्या शिक्षक समितीची सामाजिक बांधिलकीची जाणीव कौतुकास्पद- आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

शिक्षक समितीची सामाजिक बांधिलकीची जाणीव कौतुकास्पद- आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

शिक्षक समितीची सामाजिक बांधिलकीची जाणीव कौतुकास्पद- आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

शिक्षक समितीच्या वतीने हॉस्पिटलला मदत वाटप

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सामाजिक बांधिलकी ठेवून दिलेली मदत अभिनंदनीय असल्याचे मत महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले .
शिक्षक समितीच्या वतीने मदत निधी वाटप समारंभात केले .
यावेळी अध्यक्षस्थानी महापौर नीलोफर आजरेकर होत्या . आयुक्त पुढे म्हणाल्या `या कोवीड महामारीच्या काळात शिक्षकांनी स्वतः विविध कामे करून सर्व ठिकाणी प्रशासनास सहकार्य केले आहेच त्याच बरोबर आर्थिक योगदानही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिलेला आहे .ही बाब कौतुकास्पद असून आदर्शवत असल्याचे सांगितले .त्याचबरोबर शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची जाणीव आपल्याला असून यापुढे शिक्षकांनी हा आपला वसा नेटाने चालवावा असे आव्हान केले .तसेच शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले .
यावेळी महापौर निलोफर आजरेकर यांनी शिक्षक समिती ही सातत्याने विद्यार्थी, शिक्षक व समाजाच्या भल्यासाठी काम करत असते आणि त्यांनी पंचगंगा हॉस्पिटल व आयसोलेशन कोविड केअर सेंटरला मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले . यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पंचगंगा हॉस्पिटल ,आयसोलेशन कोविड केअर सेंटर तसेच पंचगंगा स्मशानभूमी यांना दीड लाखाहून अधिक रुपयांची औषधे व साहित्य दिले . यावेळी उपायुक्त माननीय निखील मोरे ,महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे उपस्थित होत्या .
यावेळी प्रशासन अधिकारी शंकर यादव शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई यांनी शिक्षक समिती विद्यार्थी, शिक्षक व समाजाच्या भल्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली . यावेळी पंचगंगा हॉस्पिटलच्या वतीने गरोदर मातांना विविध शासकीय योजनांची माहिती असलेली फाईल तयार करण्यात आली . त्याचे उद्घाटन यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .ही फाईल गरोदर मातांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती देणारी ठरणार आहे .
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सुधाकर सावंत यांनी केले .सूत्रसंचालन डॉ .स्वाती खाडे -पाटील यांनी केले .आभार शहराध्यक्ष संजय पाटील यांनी मानले .
यावेळी मेडिकल ऑफिसर डॉक्टर रमेश जाधव ,पंचगंगा हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर विद्या काळे ,नयना बडकस, आशालता कांजर, शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई ,प्रकाश पाटील, संजय कडगांवे,तानाजी पाटील, वसंत आडके, सुभाष धादवड,सुनील पाटील ,उत्तम कुंभार, मजीद नदाफ ,संतोष कदम ,मनोहर शिंदे, विठ्ठल दुर्गुळे, मनोज सौरभ, योगेश व्हटकर, मंगेश चव्हाण,फारुख डबीर ,शकील भेंडवडे, जलील शेख ,अनिल बचाटे,नियाज नदाफ ,हनीफ नाकाडे, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर पंचगंगा हॉस्पिटलचा स्टाफ यावेळी उपस्थित होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments