जठारवाडी व वळीवडेतील अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचा दिलासा
आठ मृतांच्या कुटुंबीयांना दिली प्रत्येकी ५० हजारांची मदत
जठारवाडी/प्रतिनिधी : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबियाना आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने दिलासा दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीन मुस्लिम यांनी या आठही कुटुंबांना भेटी देऊन प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदतीचे धनादेश दिले.आठवड्यापूर्वी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी ही मदत जाहीर केली होती.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेश लाटकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई-भामटेकर, प्रदीप पाटील -भुयेकर, सरपंच नंदकुमार खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम कासार, वसंतराव घोडके आदी प्रमुख उपस्थित होते.याबाबत अधिक माहिती अशी, करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील सहा व वळीवडे येथील दोन अशा आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. काही वारकरी जखमी झाले. यावेळी मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुनोनी येथे अपघातात मृत्यू झालेल्या जठारवाडी, ता. करवीर येथील कै.शारदा आनंदराव घोडके, कै.सर्जेराव श्रीपती जाधव, कै.सुनीता सुभाष काटे, कै.शांताबाई जयसिंग जाधव, कै. रंजना बळवंत जाधव, कै. सरीता अरुण शियेकर या सहा जणांचा मृत्यू झाला होता. वळीवडे येथील कै. सुशीला पोवार व कु. गौरव पोवार या मायलेकरांचा मृत्यू झाला होता. या सर्व वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.
“संकटग्रस्तांचे देवदूत……”
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, आमदार हसन साहेब मुश्रीफ हे गोरगरिबांचे आधारवड आहेत. संकटग्रस्तांचे तर्फे देवदूतच आहेत. संकटात असलेल्यांच्या मदतीला धावून जाणे हाच त्यांचा खरा धर्म आहे.जठारवाडी व वळीवडे ता. करवीर येथील अपघातात मृत वारकऱ्यांच्या घरी भेट देऊन प्रत्येक कुटुंबाला आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी ५० हजारांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला.