स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १७ व १८ नोव्हेंम्बर रोजी आंदोलन
कोल्हापूर/प्रतिनिधी : साखरेचे दर ३१०० वरून ३५०० रुपये करावे व इथेनॉल दर ५ रुपयांनी वाढवावे,ऊस समिती नेमण्याची मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. व येत्या १७ व १८ नोव्हेंम्बर रोजी साखर कारखान्यांनी व ऊस तोड कामगारांनी काम बंद ठेऊन या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे असेही सांगितले आहे.
साखरेच्या निर्यातील परवानगी द्यावं या मागणीसाठी म्हणून केंद्र सरकारचा लक्ष वेधण्यासाठी त्याच बरोबर राज्य सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकारवर दोन तुकड्यांमध्ये एफ आर पी देण्याचा जो कायदा केलेला आहे तो कायदा माघार घेऊन एकत्र एफआरपी द्यावी कायद्यात दुरुस्ती करावी त्याचबरोबर वजन काट्यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी काटे संगणकीतून ऑनलाईन करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या तोंडी बंद करून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले. दोन दिवस कारखाने बंद ठेवून या आंदोलनाला मदत करा आम्ही केंद्र सरकारला साखरेचा दर वाढवायला भाग पडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे सांगितले.