डॉ. शितोळेंचा कुंडलिनी योगा मोफत शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील मधुमेह आणि हृदयरोग तज्ञ डाॅ महेश्वर शितोळे यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब,मानसिक आजार औषधे असुनही नियंत्रणात येत नाहीत हे ओळखून कुंडलिनी योगा चे मोफत मार्गदर्शन शिबिरे चालू केली आहेत.या शिबिराचा जवळजवळ १५० हून अधिक रुग्णांना फायदा झाला आहे.
त्या मध्ये रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल झालेला आहे. डॉ. शितोळे यांच्या मते, औषधाबरोबर कुंडलिनी योगाची साथ मिळाली तर आजार नियंत्रणात येतात. हे आपण सिध्दही केले आहे.जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर शिव समर्थ चे सदस्य असलेल्या डाॅ. शितोळे यांनी कोरोना काळात ही अतिशय चांगले काम केले आहे. रूग्णांना दिलासा देण्यापासून चांगल्याप्रकारे सेवा देण्याचे काम त्यांनी केले आहे. ग्रामीण भागात गरीबांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, विविध आजार नियंत्रणात आणण्यासाठी कोणते उपाय करावेत, आहार कधी कसा घ्यावा यासाठी ही त्यांनी मोफत शिबीराव्दारे माहिती दिली. त्यांच्या समाजपयोगी केलेल्या कामाची दखल अनेक संस्थानी घेऊन त्यांना सन्मानित केले आहे.डॉ. शितोळे यांचे आई-वडील व पत्नीही डॉक्टर आहेत.