Saturday, December 21, 2024
Home ताज्या शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दोन दिवसात निकाली काढा, अन्यथा गय केली जाणार नाही...

शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दोन दिवसात निकाली काढा, अन्यथा गय केली जाणार नाही : श्री. राजेश क्षीरसागर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश

शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दोन दिवसात निकाली काढा, अन्यथा गय केली जाणार नाही : श्री. राजेश क्षीरसागर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शासनाचे निर्देशानुसार काम करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे मंजूर झालेला निधी, योजना प्रलंबित राहतात. योजना व निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचे रान करतात पण, योजनेचे कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करतात आणि योजना रखडली जाते. याचे उत्तर लोकप्रतिनिधींना जनतेस द्यावे लागते. अशा प्रलंबित योजना, रस्त्यावरील खड्डे यामुळे राज्यात कोल्हापूरची बदनामी होत आहे. कंत्राटदार दिलेल्या मुदतीत काम करत नसतील, हलगर्जीपणा करत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाका. लोकांचे जीव जाण्यापर्यंत रस्त्यावरील खड्यांवर महापालिका प्रशासन उपाययोजना करत नाही, महापालिकेचे विभागीय कार्यालयांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मंजूर असलेल्या निधीबाबत प्रसिद्धी माध्यमाना अधिकारी चुकीची माहिती देतात. शहराच्या विकासाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. हा भोंगळ कारभार तात्काळ सुधारावा. शहरातील धोकादायक खड्डे दोन दिवसात मुजवा, अन्यथा गय केली जाणार नाही, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिले. शहरातील धोकादायक खड्डे, नगरोत्थान निधी याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी व कोल्हापूर जिल्हा व शहर नागरी कृती समिती पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस कृती समितीच्या वतीने भूमिका मांडताना मा.महापौर आर.के.पोवार यांनी, रस्त्यावरील खड्डे मुजविन्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध केला आहे काय? जिथे जास्त रहदारी आहे अशा प्रमुख ठिकाणचे रस्ते तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. यासह सुरु असलेल्या पॅचवर्कचा दर्जा योग्य नसल्याने रस्ता दुरुस्त केल्या केल्या उखडला जात आहे. शहरात सर्वत्र अशी परिस्थिती असल्याने कोल्हापूरची “खड्डेपूर” अशी बदनामी अखंड महाराष्ट्र राज्यात होत आहे. याकडे कृती समिती वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. प्रशासनाच्या शब्दाला मान देवून आंदोलन स्थगित केले आहे. पण खड्डे मुजविण्यासाठी करण्यात येणाऱ्या पॅचवर्कचा दर्जा योग्य नसल्याने पुन्हा कृती समिती यावर आवाज उठवत असल्याचे सांगितले.
यावेळी माहिती देताना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, रस्त्याच्या पॅचवर्क करिता तात्काळ ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, पॅचवर्कचे काम सुरु आहे. येत्या दहा दिवसात शहरातील पूर्ण रस्त्यांचे पॅचवर्कचा पूर्ण होईल असे सांगितले.
यावर श्री.राजेश क्षीरसागर यांनी, लोकांचे जीव जाण्याची वाट पाहू नका. प्राधान्याने शहरातील खड्यांचा प्रश्न हाती घ्या. येत्या दोन दिवसात शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क योग्य दर्जासह पूर्ण करा अशा सूचना देत. नगरोत्थान अंतर्गत मंजूर झालेल्या ११० कोटींच्या निधी बाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या.
यावर शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, नगरोत्थान अंतर्गत महापालिकेने शहरातील प्रमुख १९ रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी रु.११० कोटींच्या प्रस्तावास शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. येत्या ३ महिन्यात कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती दिली.यानंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, अधिकाऱ्यांनी दक्षतेने काम करणे गरजेचे आहे. योजना मंजूर होवून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी त्या योजनेवर महापालिकेचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही झालेली नाही. रु.११० कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते होतील. यासह विशेष निधी म्हणून रु.१५ कोटींचा निधी दिला त्यातीलही सहा कामे अपूर्ण आहेत. नुकत्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रु.८ कोटी निधीची मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. यासह मुलभूत सोई सुविधा अंतर्गत रु.२५ कोटींचा निधी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे मागितला आहे. हा निधी मंजूर करायला जीवाचे रान करावे लागते. पण, कामे अपूर्ण राहिल्याने आहे तो निधी संपवता येत नाही नवीन निधी कसा द्यायचा? अशी विचारणा आम्हाला मंत्रालयीन बैठकीत केली जाते. हे महानगरपालिका प्रशासनाचे अपयश असून, दिलेला निधी वेळेत खर्ची होवून योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे तात्काळ यात सुधारणा करावी. शहरातील उर्वरित प्रमुख रस्त्यांसाठीचा आराखडा सादर करावा. पूर संरक्षक भिंतिच्या कामाची सुरवात तात्काळ करावी. ख्रिश्चन समाज दफनभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. डेंग्यूच्या धर्तीवर शहरातील स्वच्छता, कचरा उठाव याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचनाही यावेळी केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, हर्षजीत घाटगे, नगररचना विभागाचे श्री.मस्कर, कृती समितीचे मा.नगरसेवक बाबा पार्टे, अशोक भंडारे, सुभाष देसाई, विवेक कोरडे, प्रकाश घाटगे, शिवसेना उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments