दि. सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या रिंगणात उतरले सॅलरी परिवर्तन पॅनल
कोल्हापूर/प्रतिनिधी : मानाचे स्थान असलेली व सर्व विभागांची मातृसंस्था असलेल्या दि.सांगली सॅलरी अर्नर्स कॉपरेटिव सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेची येत्या रविवारी ६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे.या निवडणुकीमध्ये सॅलरी परिवर्तन पॅनल ची स्थापना ही सभासदांनी केली आहे. या निवडणुकीमध्ये एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ व समता व बंधुता या लोकशाहीतील मूल्यांना जपत सॅलरी परिवर्तन पॅनल ही काम करणार आहे अशी माहिती पॅनल प्रमुख बजरंग कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.सभासदांच्या हिताकरिता कारभारी बदलणे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही सॅलरी परिवर्तन पॅनल निवडणूक लढवीत आहोत असेही कदम यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या कालावधीमध्ये सभासदांच्या हिताकरिता व सॅलरी संस्थेच्या विकास व उत्कर्षासाठी अनेक योजना राबविण्याचा निश्चय या पॅनल ने केला असून येणाऱ्या सहा रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सभासदांनी आम्हाला विजयी करावे असे या पॅनलच्या वतीने यावेळी सांगण्यात आले आहे. या सॅलरी परिवर्तन पॅनल मध्ये एकूण १९ जणांचा समावेश आहे.यात सर्वसाधारण मधून नामदेव पुंडलिक दवडते (विभाग – दुग्ध व्यवसाय),हाके नानासाहेब मनगिनी हाके (विभाग- शास्त्रीय तंत्रनिकेतन), राजू अशोक कदम (विभाग- महसूल) रणजीत बंडू कांबळे (विभाग- जलसंपदा), दत्तात्रय बाबासाहेब कोळी (विभाग- आरोग्य ग्रामीण रुग्णालय,हिवताप), प्रकाश जनार्दन कुलकर्णी (विभाग- न्यायालय),विवेक रविंद्र कुरणे (विभाग- आरोग्य शा. वै. रुग्णालय मिरज), राजू बावल मारोडा (विभाग- आरोग्य सि.पी.आर रुग्णालय कोल्हापूर),अमजद फरीद मिरजकर (विभाग- जलसंपदा),संजय वसंत मोरे (विभाग-आरोग्य सांगली सिव्हिल), संदीप शरद पाखरे (विभाग- भूमि अभिलेख), मयूर भूपाल पाटील (विभाग- जलसंपदा), मिलिंद दत्तात्रय वझे (विभाग- सहकार व कोषागार पुरस्कृत), सतीश बाळासो यादव (विभाग- आय.टीआय), अनुसूचित जाती जमाती मधून प्रवीण बबन बनसोडे (विभाग- कृषी), भटक्या विमुक्त जाती व जमाती /वि.मा. प्र मधून रवींद्र बाळासाहेब हराळे(विभाग-महसूल),इतर मागास प्रवर्गातून अमेय महादेव जंगम(विभाग-जलसंपदा),महिला राखीव मधून मानसी मनोजकुमार(विभाग-आरोग्य सांगली सिव्हिल), पदमश्री रविंद्र कबाडे(विभाग-आरोग्य शासकीय वै.रुग्णालय मिरज)आदींचा समावेश आहे.यावेळी पत्रकार परिषदेला नितीन कुलकर्णी, राजू मारोडा, विनायक कांबळे, रनजीत कांबळे, गौतम माने, गणेश माळावी,विक्रम रजपूत आदी उपस्थित होते.कोल्हापूर मधील विक्रम हायस्कुल येथे दोन मतदान केंद्रावर ६ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.कपबशी हे सॅलरी परिवर्तन पॅनल चे चिन्ह असून सभासदांनी आम्हाला संधी द्यावी असेही यावेळी सर्व पॅनल मधील उमेदवारांनी सांगितले आहे.