राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर दि : ४ ( जिमाका) राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले . यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा , श्रीफळ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डेव्हलपमेंट बोर्डाच्या सह सचिव श्रीमती श्वेता सिंघल , पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पो . अधिक्षक तिरुपती काकडे, करवीर प्रांतधिकारी वैभव नावडकर , देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते .