Sunday, December 1, 2024
Home ताज्या भारत जोडो यात्रा अंतर्गत कोल्हापुरात काँग्रेसचा आज ८ रोजी सायंकाळी ५ वाजता...

भारत जोडो यात्रा अंतर्गत कोल्हापुरात काँग्रेसचा आज ८ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मेळावा

भारत जोडो यात्रा अंतर्गत कोल्हापुरात काँग्रेसचा आज ८ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मेळावा देशासह, राज्यातील दिग्गज नेते राहणार उपस्थित

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत जोडो यात्रा अंतर्गत कोल्हापुरात उद्या आठ ऑक्टोबरला सायंकाळी ५ काँग्रेसच्यावतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. ऐतिहासिक दसरा चौकात हा मेळावा होत असून देशासह राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील १२३९ गावे, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर, तसेच जिल्ह्यातील सर्व १३ नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रांत १३ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा कोल्हापूर जिल्ह्याच्या गावोगावी दाखविण्याचा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सांगीतले.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली आहे. या भारत जोडो यात्रेला राज्यात ठिकठिकाणी पाठिंबा मिळत आहे. या यात्रेला पाठींबा दर्शवण्यासाठी, कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ८ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक दसरा चौकात हा मेळावा होत असल्याने या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. राजर्षी शाहू समाधी स्थळाला अभिवादन करून या मेळाव्याला सुरुवात करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग,प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दहा हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याची सर्व तयारी शुक्रवारी युद्ध पातळीवर सुरू होती.आ. पी. एन. पाटील,आ. श्रीमती जयश्री जाधव,आ.जयंत आसगांवकर,आ.ऋतुराज पाटील,आ. राजूबाबा आवळे
गुलाबराव घोरपडे, प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, प्रदेश सरचिटणीस
श्री शशांक बावचकर, प्रदेश सरचिटणीस, सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, सुप्रिया साळोखे, महिला जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, सेवादल, जिल्हाध्यक्ष संजय पोवार-वाईकर, सेवादल, शहराध्यक्ष उदय पोवार, युवक शहराध्यक्ष,वैभव तहसीलदार, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय शेळके, एनएसयूआय, शहराध्यक्ष
पार्थ मुंडे, जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष तसेच सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments