Friday, July 19, 2024
Home ताज्या गोकुळतर्फे सव्वा लाख रुपये बक्षिसांची ७ ऑक्टोबरला झिम्मा-फुगडी स्पर्धा -चेअरमन विश्वास पाटील

गोकुळतर्फे सव्वा लाख रुपये बक्षिसांची ७ ऑक्टोबरला झिम्मा-फुगडी स्पर्धा -चेअरमन विश्वास पाटील

गोकुळतर्फे सव्वा लाख रुपये बक्षिसांची ७ ऑक्टोबरला झिम्मा-फुगडी स्पर्धा -चेअरमन विश्वास पाटील

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.,(गोकुळ)कोल्हापूर यांच्या वतीने शुक्रवार  दि. ०७ ऑक्टोबर २०२२ इ.रोजी सव्वा लाख रुपये बक्षिसांची गोकुळ झिम्मा-फुगडी स्पर्धा या स्पर्धेमध्ये झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, छुई –फुई  महिलांच्या पारंपारिक खेळांचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे .
गोकुळने महिला सबलीकरणाचे काम आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत चांगल्याप्रकारे केलेले आहे.महिलांचे बचत गट तयार करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गोकुळने नेहमीच प्रयत्नशील आहे. मराठमोळ्या संस्कृतीची परंपरा जोपासताना महिलांच्या पारंपारिक खेळांना संधी प्राप्त करून देण्यासाठी गोकुळ प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे आयोजन करत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच सण-उत्सवांवर निर्बंध होते. निर्बंध उठवल्यानंतर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदरच्या स्पर्धा शुक्रवार दि.०७ ऑक्टोबर २०२२ इ. रोजी सकाळी ११ वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या आहेत सदर स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील ,आघाडीचे प्रमुख नेते व संचालक मंडळ यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी पंचाच्या मार्फत सांगण्यात येतील. या व्यतिरिक्त गोकुळने प्रसिद्ध केलेल्या भित्तीपत्रकावर देखील त्यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे. सदरच्या स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळशी सलग्न दूध संस्थाच्या दूध उत्पादक महिलांकरिता आयोजित केलेल्या असून गोकुळमार्फत विजेत्या संघांना रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments