Friday, December 20, 2024
Home ताज्या कोल्हापूरचा दसरा महोत्सव होणार भव्य शाही सोहळा  नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राहुल...

कोल्हापूरचा दसरा महोत्सव होणार भव्य शाही सोहळा  नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूरचा दसरा महोत्सव होणार भव्य शाही सोहळा
 नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर, दि.३(जिमाका): कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा महोत्सव यावर्षी पर्यटकांचे विशेष आकर्षण बनणार आहे. बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसऱ्यादिवशी भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर देवीच्या पालख्यांसोबत राजेशाही मिरवणूक, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या महोत्सवातून घडेल. राज्यासह देशभरातील नागरिकांनी शाही दसरा महोत्सवात सहभागी होऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापूरमध्ये साजरा होणारा शाही दसरा महोत्सव राजघराण्याच्या मान्यतेने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावर्षी भव्य स्वरुपात साजरा होणार आहे.

शाही लवाजमा

दसऱ्याच्या दिवशी बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सवासाठी श्री शाहू महाराज छत्रपती यांचे मेबॅक गाडीतून शाही लवाजम्यासह आगमन होईल. दरम्यान दुपारी ४ पासून मिरवणूक मार्गावर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होईल. कोल्हापूरच्या दसरा महोत्सवात सुशोभित केलेले घोडे व उंट, मावळ्यांच्या पोशाखात हातात तलवारी भाले व ढाल घेतलेले घोडेस्वार, मावळे, मर्दानी खेळ अशा शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात यावर्षीचा दसरा महोत्सव साजरा होणार आहे.

विविध कलाप्रकारांचे सादरीकरण

याशिवाय मिरवणूक मार्गावर देवीच्या पालख्यांसह चित्ररथ, लेझीम, ढोलपथक, धनगरी ढोल, गजनृत्य, मल्लखांब, कुस्तीची प्रात्यक्षिके, पोवाडा तसेच विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूला एनसीसीचे विद्यार्थी मिरवणुकीत पुष्पवृष्टी करतील. याठिकाणी बचतगटांचे स्टॉल्स असणार आहेत. न्यू पॅलेस ते दसरा चौक मार्गावर मोटरसायकल टीम व पोलीस विभागाचे पथक बुलेट व जीपसह सहभागी होणार आहे. शहरात विविध ठिकाणी एलईडीच्या माध्यमातून दसरा महोत्सवाची क्षणचित्रे दाखवण्यात येणार आहेत.

शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट: विविध कलांचे सादरीकरण व खाद्यपदार्थांची पर्वणी

कोल्हापूर दसरा महोत्सवाअंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट साजरा करण्यात येणार आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने महावीर कॉलेज ते स्टार बझार, खानविलकर पेट्रोल पंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन कमानी उभा करुन बचत गटांचे १५० स्टॉल्स उभे केले जाणार आहेत. या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या मेजवाणीबरोबरच विविध वस्तुचे स्टॉल, मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर लेझीम, झांजपथके, गरबा नृत्य, ड्राईंग, स्केचींग, लाठीकाठी, झिम्मा फुगडी, मेहंदी, फनी गेम्स, पारंपरिक खेळ असणार आहेत. गोट्या, टायर फिरवणे, विटी-दांडू, कुस्ती, चुयीमुयी, गजगे असे पारंपरिक खेळ खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर नृत्य, गायन, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. या ठिकाणी महापालिकेच्यावतीने लाईटची व्यवस्था, वैद्यकीय पथक, अग्निशमन गाडी, पिण्याच्या पाण्याचा टँकर आदी सुविधा ठेवण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी १०० फुटी डी.पी.रोड व महावीर कॉलेज या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिका मुख्य इमारत व शहरातील मुख्य पुतळयांभोवती विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या फेस्टीवलचे संयोजन शाही दसरा उत्सव समितीने केले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब या ‘शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट’ला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकसहभागावर भर

हा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक आणि अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. या दसरा महोत्सवात अधिकाधिक नागरिक सहभागी होण्यासाठी तसेच यात विविध घटकांना सामाविष्ट करुन घेवून या महोत्सवाला शाहूकालीन महोत्सवाचे स्वरुप प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
वाहतूक व्यवस्था- महोत्सवासाठी नागरिकांचा प्रतिसाद पाहता वाहतूक मार्गात बदल, पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments