भारतीय बौद्ध जन विकास परिषदेच्या वतीने ताराराणी चौकात तीव्र निदर्शने
कोल्हापूर/प्रतिनिधी : मुंबई येथे दलित युवती रुपाली चंदनशिवे हिची तिचा मुस्लीम पती इकबाल शेख याने रुपाली हिने मुस्लीम रिवाज पाळण्यास नकार दिल्याने तिची भर रस्त्यात क्रूरपणे गळा चिरून हत्या केली. तरी रुपाली चंदनशिवे हिची हत्या करणार्या इकबाल शेखला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात शासनाने कठोर कायदा करावा, अशी मागणी भारतीय बौद्ध जनविकास परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विवेक राजवर्धन यांनी केली. रुपाली चंदनशिवे हिला न्याय मिळण्यासाठी २ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता छत्रपती ताराराणी चौकात भारतीय बौद्ध जन विकास परिषदेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. त्या प्रसंगी त्यांनी ही मागणी केली. या प्रसंगी ‘रुपालीला त्वरित न्याय द्या’, ‘आरोपी इकबाल शेखला तात्काळ शिक्षा करा’यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सतीश सोनवणे, वेदार्थ राजवर्धन, प्रणव मुळीक, प्रेम जोंधळे, सचिन पोवार, सूरज चव्हाण यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.