शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा
कोल्हापूर /प्रतिनिधी : साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणून करवीर काशी म्हणजेच कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक यावेळी दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ‘शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य व सर्वात मोठा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे अशी माहिती आयोजिका पूनम राकेश (गणेश) काटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरवर्षी हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. पण कोरोनानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा होत आहे. त्यामध्ये नवरात्रातील नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मारुती मंदिर चौक , शाहुपुरी, पाचवी गल्ली येथे स्टॅंडिंग लाईट शो, ॲडव्हान्स शार्पी, ॲडव्हान्स एलईडी, एलईडी वॉल, डीजे, स्मोक, लेजर आधुनिक लाईट शो, करवीर ढोल पथक तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये देवी मूर्ती आगमन सोहळा, मूर्ती प्रतिष्ठापना, रास दांडिया, श्रीसूक्त पठण, कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ सोहळा, माता पायपूजन सोहळा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मुलींसाठी दांडिया स्पर्धा, लहान मुलामुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दररोज रात्री साडे आठ वाजता आरती व राष्ट्रगीत असणार आहे.
भागातील महिला मुलींसाठी रोज रास दांडिया, स्पोर्ट गेम्स आणि रोज लकी ड्रॉ मध्ये मानाची साडी आणि उल्लेखनीय सहभागासाठी हॉटेल चे फॅमिली पास मिळवण्याचा मान महिला वर्गाला मिळणार आहे. तसेच २५ सप्टेंबर २०२२ आणि ४ ऑक्टोबर २०२२ च्या लकी ड्रॉ मधील विजेत्यास दोन व्यक्तींसाठी कोल्हापूर तिरुपती विमान तिकीट मोफत मिळण्याची संधी उपलब्ध असणार आहे. देवी मूर्ती उद्घाटन कार्यक्रमास सौ. मधुरिमाराजे छत्रपती आणि आमदार जयश्री चंद्रकांत जाधव तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ.श्वेता पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होईल. तरी सर्वात मोठा भव्य नवरात्र उत्सव साजरा करणारे शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळ हे एकमेव मंडळ आहे. तरी या उत्सवांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस कीर्ती खाडे, स्वाती चोरगे, पूजा आरेकर, अर्चना मेढे, सुजाता नलवडे, ललिता शिंदे आदी उपस्थित होते.