विश्वची फिलीपिन्समधील एमबीबीएसच्या शिक्षणासाठी बॅच रवाना
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील आणि परदेशातील मेडिकल प्रवेशासाठी अग्रगण्य असणारी संस्था विश्व दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातून सुमारे २०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी आज फिलीपिन्स या देशात रवाना करण्यात आले आहे. यावेळी विश्वचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर भस्मे यांच्यासह विश्वची संपूर्ण टिम मुंबई एअरपोर्टवर विद्यार्थ्यांना पुढील मार्गदर्शनासाठी उपस्थित होती.
गेल्या २३ वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेशासाठी लागणारे परिपुर्ण मार्गदर्शन विश्वच्या वतीने दरवर्षी मोफत करण्यात येते. गेल्यावर्षी सुमारे ३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेवून आपला प्रवेश निश्चीत केला. यावर्षीही नीट परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासाठी विश्वने मोफत मार्गदर्शन केले आणि आज सुमारे २०० विद्यार्थ्यांची बॅच एमबीबीएसच्या शिक्षणासाठी फिलीपिन्स या देशात पाठविण्यात आली. भारत सरकारचा नवा कायदा फिलीपिन्समध्ये मंजूर करण्यात आला आहे. फिलीपिन्सचे चिल्ड, हायर एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ फिलीपिन्स यांनी साडेपाच वर्षाचा एमबीबीएस कोर्स केला असल्याने फिलीपिन्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. तसेच माफक फी असल्याने विश्वने विद्यार्थ्यांना फिलीपिन्स येथील ब्रोकनशअर युनिर्व्हसिटी आणि दबाओ युनिर्व्हसिटीमध्ये पाठवले असून फिलीपिन्ससाठी आता तिसरी बॅच लवकरच पाठविण्याचा मानस असल्याचे विश्वचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे यांनी यावेळी स्पष्ट केले .
डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्व संस्थेमार्फत मोफत मार्गदर्शन दिले जाते. ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले आहे. कमी बजेट मध्ये सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण, परदेशातही मराठी मुलांसाठी संस्थेचे हॉस्टेल, महाराष्ट्रीयन आचारी तसेच शिक्षक या सुविधा विश्व तर्फे परदेशातही पुरविल्या जातात. या विद्यार्थ्यांसाठी विश्वचे ६ संचालक, २०० कर्मचारी अगदी ३६५ दिवस कार्यरत असतात. विश्वच्या महाराष्ट्रात १६ शाखा आहेत. भारतातील तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये संस्थेची पार्टनरशिप आहे. विद्यार्थ्यांसाठी विश्व मार्फत एज्युकेशन लोन व्यवस्था, पासपोर्ट सेवा, विमान {तकीट आणि करंसी एक्चेंज या सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. वैद्यकीय क्षेत्रात करीअर करुन पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश कशाप्रकारे मिळतो आणि त्याबाबतच्या शैक्षणिक पध्दतीची माहिती देण्यासाठी {वश्वने मोफत मार्गदर्शन कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेंगलोर, नाशिक याठिकाणी सुरु केले आहे. सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसह पालकांना मेडिकलच्या कोर्स बाबतची माहिती देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम ७०३०३०६६११ या क्रमांकावर संपर्क साधून आपली वेळ निश्चित करावी आणि विश्वच्या कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन विश्वच्या वतीने करण्यात आले आहे.