हंम्पी येथे झालेल्या हंम्पी ऑफ रोड चॅलेंजमध्ये अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव या कोल्हापूरच्या जोडीचा प्रथम क्रमांक
कोल्हापूर/प्रतिनिधी : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंम्पी येथे १६ व १७ आणि १८ सप्टेंबर रोजी कर्नाटक पर्यटन आणि युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाद्वारे प्रायोजित विजयनगरच्या मोटर स्पोर्ट अकॅडमीने आयोजित केलेल्या उत्सव द हंम्पी २०२२ च्या ४×४ हम्पी ऑफ रोड चॅलेंजच्या तिसऱ्या आवृत्तीत कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव या कोल्हापूरच्या जोडीने स्टॉक क्लास पेट्रोल या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ४×४ हम्पी ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेमध्ये विजापूर,हैदराबाद, बेंगलोर, कर्नाटक गोवा केरळ अशा विविध ठिकाणांवरून स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा होस्पेटच्या हद्दीतील तुंगभद्रा धरणाशेजारच्या कुंडा जंगलात पार पडली. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते असे आहेत. प्रो मॉडिफाइड क्लास – रामबाबू आणि अन्वेष (हैदराबाद),मॉडीफाईड क्लास – मनोजकुमार आणि संतोष (विजापूर), स्टॉक क्लास (डिझेल) नवीन आणि गिरी (बेंगलोर), स्टॉक क्लास (पेट्रोल) अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव (कोल्हापूर) आदींचा समावेश आहे.युवा नेते सिद्धार्थ सिंग, एच आर विरुपाक्ष, सामाजिक कार्यकर्ते पंथर जयंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक हे रोहित गौडा आणि संतोष एच एम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कोल्हापूरच्या अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव या स्पर्धकांना कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे सहकार्य लाभले.