आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने मंजुळा जाधव सन्मानित
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुळा जाधव यांना इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे (इम्सा) आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थित मंजुळा जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मंजुळा जाधव म्हणाल्या, सिम्बॉलिकचे गीता पाटील व गणपतराव पाटील यांनी दाखवलेला विश्वास, सर्व सहकारी शिक्षकांनी दिलेली साथ यांच्यामुळेच चांगल्या पद्धतीने काम करता आले. या कामाची दखल घेत इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने हा पुरस्कार दिला. मला मिळाला हा सन्मान फक्त माझा नसून संपूर्ण सिम्बॉलिकच्या टीमचा आहे.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकुडे, क्रेडोच्या सीईओ मृदुला श्रीधर आदी प्रमुख उपस्थित होते.