रत्नपारखी अनु.एच. मोतीवाला यांच्याकडून एकटी संस्थेला गरजू साहित्य भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : निसर्गाने मानवाला अनेक गोष्टींचा साठा मुक्तहस्ताने दिला आहे. शिवाय सर्वांना जरी एकसारखे घडविले असले तरी प्रत्येकाची परिस्थितीही सारखीच असेल असे नाही अशाच निराधार महिलांना आधार देणाऱ्या अवनी व एकटी संस्थेला नवग्रह रत्न केंद्र प्रसिद्ध रत्नपारखी अनु.एच. मोतीवाला व सत्यजित भोसले यांच्याकडून रोजच्या आहारात लागणारे साहित्य हे देण्यात आले.यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी,तेल डबा,साबण,तांदूळ,साखर ,फिनेल अशा वस्तूंचा समावेश आहे.रत्नपारखी अनु.एच. मोतीवाला यांच्याकडून एकटी संस्थेला दिलेल्या या भेटीबाबत अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी आभार मानले.यावेळी अनु. एच.मोतीलाल यांनी यापुढेही आमचे सहकार्य राहील असे सांगितले.